प्रभाग १३ चे प्रभावी उमेदवार ठरणार कैसर पटेल....
वणी पालिकेचे होते उपाध्यक्ष :- प्रभावी उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष...
वणी :- सुरज चाटे
प्रभाग क्रमांक १३ मध्ये यंदाची निवडणुकीची हवा रंगत असताना एक नाव जनमानसात ठळकपणे संभाव्य उमेदवार म्हणुन उच्चारले जात आहे ते म्हणजे कैसर पटेल. समाजहितासाठी सदैव तत्पर, हिंदू-मुस्लिम असा कुठलाही भेदभाव न करता समान न्याय देण्याची भूमिका जपणारे, साधी राहणी उच्च विचार हे ब्रीद असलेले कैसर पटेल हे जनतेच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत.
यापूर्वी वणी नगरपरिषदेच्या गाडगे बाबा चौक परिसरातून सदस्य म्हणून कार्यरत राहून, वणी नगर परिषदेचे उपाध्यक्ष पद सुद्धा भूषविले आहे. तसेच शिक्षण सभापती म्हणुन कार्यकाळ यशस्वी पार पाडला. पटेल यांनी प्रत्यक्ष कामगिरीचा ठसा उमटवला आहे. नेहमी सर्वसामान्यांच्या संपर्कात राहून, समस्या ऐकून तत्काळ तोडगा काढण्याची त्यांची कार्यपद्धती सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. समाजकार्यातील सक्रियता, सर्वधर्मीयांना समान वागणूक, सेवाभावी कार्यामुळे जनतेचा विश्वास त्यांनी संपादन केला आहे.
यामुळेच प्रभाग क्रमांक १३ मध्ये कैसर पटेल हे एक प्रभावी उमेदवार ठरणार, अशी जोरदार चर्चा सध्या जनतेत घुमत आहे. आगामी निवडणुकीत त्यांची पुढील रणनीती काय असेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.








0 Comments