ADvt

प्रभाग १० मध्ये नवे समीकरण! संदीप उर्फ श्याम ठाकरे यांचे नाव चर्चेत.....



प्रभाग १० मध्ये नवे समीकरण! संदीप उर्फ श्याम ठाकरे यांचे नाव चर्चेत.....

कर्तव्यदक्ष, जनसंपर्कात पारंगत व हक्कांसाठी झटणारे संदीप उर्फ श्याम ठाकरे संभाव्य उमेदवार म्हणून आघाडीवर..

वणी :– सुरज चाटे

      प्रभाग क्रमांक १० मध्ये निवडणुकीची शर्यत रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. सामाजिक कार्यात सक्रीय, लोकसंग्रहात तरबेज आणि प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणाऱ्या श्याम ठाकरे यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून जोरदार चर्चेत आहे.
     स्थानिक पातळीवर सक्षमीकरण, नागरिकांच्या प्रश्‍नांवर तातडीने प्रतिसाद, तसेच तरुणांना राजकारणात संधी मिळावी यासाठी ठाकरे यांनी केलेल्या अनेक कामामुळे त्यांना व्यापक जनसमर्थन लाभत असल्याचे चित्र आहे.
     यामुळेच प्रभाग १० मध्ये त्यांचे उमेदवारीचे नाव जाहीर झाले तर निवडणूक चुरशीची होणार, अशी चर्चा गल्लीबोळात सुरू आहे.

Post a Comment

0 Comments