ADvt

नृसिंह व्यायाम शाळा येथे चित्तथरारक शिवकालीन मर्दानी शस्त्रविद्धेचे प्रात्यक्षिके.....

 

नृसिंह व्यायाम शाळा येथे चित्तथरारक शिवकालीन मर्दानी शस्त्रविद्धेचे प्रात्यक्षिके.....

26 Jun, 2022

ImageImage

वणी: सुरज चाटे

गेल्या दोन महिन्यापासून उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त वणीतील नृसिंह व्यायाम शाळेच्या पटांगणात चिमुकल्यांसाठी लाठीकाठी व मर्दाणी खेळाचे प्रशिक्षण सुरू आहे. विशेष म्हणजे हे प्रशिक्षण अवघ्या 9 व्या वर्गात असलेली कु. तेजस्वीनी राजू गव्हाणे सह नृसिंह व्यायाम शाळेचे पदाधिकारी यांनी सहकार्य दर्शवित प्रशिक्षण देत होती. रोज या प्रशिक्षणात 40 ते 50 विद्यार्थी स्वसंरक्षणाचे धडे गिरवत होते. रोज सकाळी 6 ते 8 व संध्याकाळी 6 ते 7.30 या कालावधीत हे प्रशिक्षण होत होते या प्रशिक्षणाची सांगता दिनांक 25 ला सायंकाळ दरम्यान करण्यात आली असून यावेळी चिमुकल्यानी प्रशिक्षण कर्त्यांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके करून दाखविले यावेळी अनेक वणीतील दिगंजांची उपस्थिती होती, यावेळी उपस्थित मान्यवरांनी चिमुकल्यांना उकृष्ठ असे मार्गदर्शन केले.

वणी तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले राजु देवरावजी गव्हाणे यांची मुलगी तेजस्वीनीला बालपणापासूनच साहसिक खेळाची आवड आहे. वयाच्या सातव्या वर्षांपासून तिने नृसिंह आखाड्यात लाठीकाठी व इतर साहसिक खेळांचे प्रशिक्षण घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर पुढील प्रशिक्षण तिने नागपूर येथील सुप्रसिद्ध लाठीकाठी वस्ताद आप्पासाहेब भोसले यांच्या ताजराज हिरा आखाडा येथे घेतले आहे.

तेजस्वीनी ही एसपीएम शाळेची विदयार्थीनी असून ती नुकतीच इयत्ता 8 वी उत्तीर्ण केली आहे. ती लाठिकाठीसह तलवारबाजी, दांडपट्टा, बाना, भालाफेक इत्यादी साहसिक खेळात निपून आहे. याशिवाय कराटे या खेळातही ती ब्लू बेल्ट आहे. विविध साहसिक खेळासह ती वकृत्व, इतर कला व सामाजिक कार्यतही ती अग्रेसर असते. कु. तेजस्वीनी ही शहरातील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार राजू गव्हाणे यांची कन्या आहे या कार्यक्रमाला देवरावजी गव्हाणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष राजू भाऊ उंबरकर, माजी नगराध्यक्ष, क्रांती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा पुसद अर्बन बँकेचे उपाध्यक्ष राकेशभाऊ खुराणा, विधितज्ञ निलेश चौधरी, प्राचार्य रोहित वनकर, नृसिंह व्यायाम शाळेचे अध्यक्ष प्रमोद इंगोले, पुरुषोत्तम आक्केवार, राजु गव्हाणे, राजुभाऊ देवडे, कैसर पटेल, रमेश शर्मा, रमेश उगले, बाबा उगले, मुख्य प्रशिक्षक तेजस्विनी गव्हाणे, कार्तिक पटेल, दीपक देठे, सागर डोंगरे, कुणाल ठोंबरे हे उपस्थित होते.


Image


वाचकांना सूचना :- सत्यभाषा या न्युज पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक / संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो यवतमाळ जिल्हा न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.

Post a Comment

0 Comments