ADvt

वारगाव (नविन) परिसरात वाघाची दहशत......



वणी :- सुरज चाटे 
     वणी तालुक्यातील वारगाव (नविन) नजीकच शेतशिवार परिसरात गेल्या काही दिवसांपासून पट्टेदार वाघाचे दर्शन गावकऱ्यांना झाल्याची चर्चा सुरू असून त्यामुळे गावकरी चांगलेच भयभीत झाले आहे परिणामी रात्रपाळीवर जाणारे सुद्धा आता जात नसून गावकरी रात्री 6 वाजले की आपले घर बरे असाच निर्णय घेत आहे. दरम्यान च्या काळात सदर वाघाने गोऱ्याचा सुद्धा फडशा पाडला असून शेतकऱ्याचे नुकसान केले आहे तर गावकऱ्यांना वाघाचे दर्शन सुद्धा झाले असल्याने सदर परिसर वाघाच्या दाहशतीतच असल्याचे दिसत आहे. 
     वणी तालुक्यात सध्या वाघाची दहशत सुरू असून कधी सुंदरनगर, तरोडा, पिंपळगाव, आदी ठिकाणी वाघाची मोठी दहशत होती परंतु वारगाव (नविन) येथील भिकाजी संभाजी भोयर यांच्या मालकीच्या गोऱ्याचे अंदाजे किंमत रु 70,000/-) वाघाने फडशा पाडल्याचे दिनांक 13 ऑक्टोबर 2022 निदर्शनात आले असुन, वाघाचा तातडीने बंदोबस्ताची गरज निर्माण झाली असुन, आता चक्क शहराच्या काही अंतरावरच पट्टेदार वाघ दिसल्याची चर्चा असल्याने वन विभागाने तातडीने यावर लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असून भयभीत झालेल्या जनतेला वाघाला ताब्यात घेत तसेच उपाययोजना करून भयभीततेपासून जनतेला मुक्त करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

वन विभाग ऍक्टिव्ह मोडवर....
     वाघ जरी शांत असला तरी परिसरातील परिस्थिती लक्षात घेता तात्काळ त्याच परिसरात वन विभागाचे वन रक्षक ठेवण्यात आले असुन, वणी वन परीक्षेत्राची चमू तयार करण्यात आली आहे, सदर चमू वारगाव नवीन येथे दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेतला असुन, तसेच परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा वन विभागाकडून देण्यात आला आहे. 

वाघांचा तातडीने योग्य तो बंदोबस्त व्हावा....
     वारगाव (नविन) परिसरात असलेल्या वाघामुळे येथील जनता चांगलीच भयभीत झाली असुन त्यामुळे केव्हा कधी कोणती अनुचित घटना घडणार याचा नेम उरला नाही, त्यामुळे वन विभागाने तातडीने वाघांचा बंदोबस्त करावा असे गावकार्या सुद्धा यावेळी बोलुन दाखवले.

Post a Comment

0 Comments