ADvt

रांगणा भुरकी येथे वाघाच्या हल्यात युवक ठार...
अचानक वाघ झाला नरभक्षी :- अखेर गेला अभय देउळकर नामक निष्पाप युवकाचा जीव...

वणी :- सुरज चाटे

     रांगणा भुरकी शेत शिवारात अचानक दिनांक 10 नोव्हेंबर 2022 ला 5.30 संध्येला वाजताच्या दरम्यान अभय मोहन देऊळकर वय 25 वर्ष रांगणा भुरकी येथील युवकावर हल्ला करून वाघाने त्या युवकावर अचानक हल्ला चढवत, हल्यात युवक मृत  पावल्याची घटना घडली आहे. 
    भुरकी रांगणा येथील अभय मोहन देऊळकर, वय 25 वर्ष हा भुरकी शेत शिवारात शेताला पाणी देत असताना अचानक वाघाने हमला चढविला त्यात दोघे जण शेतीला पाणी देत असताना अभयवर वाघाने हल्ला चढविला परंतु, दुसरा इसम त्या ठिकाणाहून मोठमोठे आवाज करीत, पळाला त्यात कुणी घटनास्थळी यायच्या अगोदर वाघाने अभयला ओढत नेऊन त्याला मृत केले. त्याचे प्रेत सापडले असून. संपूर्ण गांव दहशतीच्या वातावरणात असून. घटनास्थळी बघ्याची मोठी गर्दी होती. वृत्त लिहेपर्यंत कोणताही शासकीय विभाग घटनास्थळी दाखल झाला नव्हता. 

Post a Comment

0 Comments