ADvt

मराठी रंगभूमी दिवस साजरा ....



सागर झेप बहुद्देशीय संस्थेच्या वतीने दरवर्षी 5 नोव्हेंबर ला मराठी रंगभूमी दिवस साजरा करण्यात येतो. शहरात   नाट्य कला जिवंत ठेवण्याचे कार्य सुरू आहे.  2014 पासून वणीच्या कलावंताला घेऊन राज्य नाट्य हौशी स्पर्धेत सहभाग घेण्यास सुरुवात केली असून बालनाट्य, महिला नाट्य, पथनाट्य आणि इतर शासकीय प्रकल्प मध्ये काम करते तसेच या वर्षी व्यावसायिक नाटक सुद्धा करणार आहे.  

ब्राईट माईंड किड्झ प्ले स्कूल येथे     मराठी रंगभूमी दिन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नाट्य कर्मी व शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव अशोक सोनटक्के होते. त्यांनी उपस्थित नवोदित कलावंतांना मार्गदर्शनात सांगितले मेहनत करणे आवश्यक आहे. तुम्हाला कोणी चुका सांगितल्या तर त्या ऐकून दुरुस्त करणे आणि खचून न जाता अभिनय उत्तम कसा करता येईल या कडे लक्ष देणे आवश्यक आहे. प्रस्ताविकात प्रवीण सातपुते यांनी मराठी रंगभूमी दिनाचे महत्व सांगितले आणि सर्वांनी ही परंपरा सुरू ठेवायची आहे. नाटक करताना त्यात वेळे देणे, बारकावे समजून घेणे, संस्थेच्या माध्यमातून आम्ही काही नाटकांच्या स्पर्धेत सहभागी झालो व खूप काही शिकायला मिळाले, म्हणून आपल्याला रंगभूमीशी प्रामाणिक राहून कार्य करत राहायचे आहे. या कार्यक्रमात शुभम उगले याचा सत्कार करण्यात आला, त्याने नुकताच मराठी चित्रपट पल्याड केला व मर्डर ऑफ कोर्टरूम ही वेब सीरीज केली आहे. त्याचे यश हे कौतुकास्पद आहे.  यावेळी विलास झट्टे, महेश ढूमने, नितीन मुंजेकर, अमोल खडसे, अक्षय धानोरकर, अक्षय रामटेके, शुभम मोहूर्ले, राहुल गोहोकार, गौरव नयनवार आणि संचालन व आभार प्रदर्शन मंगेश गोहोकार यांनी केले.

Post a Comment

0 Comments