ADvt

तब्बल तीन वर्षानंतर सिंगाडा तलाव मासेमारी करिता उपलब्ध......मुख्याधिकारी वायकोस यांच्या हस्ते शुभारंभ 

वणी मच्छिमारी सहकारी संस्थेने मानले आभार....

वणी :- सुरज चाटे

     कोरोना महामारीमुळे ३ वर्षानंतर वणी सिंगाडा तलाव वणी मच्छिमारी सहकारी संस्थेस दिल्याने भोई समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, मा. मुख्याधिकारी श्री. वायकोस साहेब यांचे हस्ते वणी सिंगाडा तलावाची पुजा करून दि. २८/१०/२०२२ ला मासेमारीचा श्री गणेशा (शुभारंभ) करण्यात आला. 
      वणी मच्छीमारी संस्थेचे अध्यक्ष श्री. भाऊराव पारशिवे यांचे हस्ते शाल व श्रीफळ देऊन मा. मुख्याधिकारी साहेबांचे स्वागत करण्यात आले. तर सचिव श्री. किशोर पारशिवे व सदस्य विनोद मांढरे, मारोती मांढरे, सुनिल चारे यांचेही हस्ते पुष्पगुच्छ देऊन मुख्याधिकारी साहेबांचे स्वागत करण्यात आले. तेव्हा संस्थेचे इतरही सभासद हजर होते.
    मासेमारी करीता तलाव ३ वर्षानंतर संस्थेस दिल्याने कोरोना महामारीमुळे ३ वर्षानंतर मासेमारी करीता तलाव उपलब्ध करून दिला म्हणून संस्थेचे सभासदांनीही मुख्याधिकारी साहेबांचे अभिनंदन केले. भोई समाजात उत्साहाचे वातवरण असुन, तलावाचे उर्वरीत काम निधीप्राप्त होताच ताबडतोब पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी साहेबांनी संस्थेचे सभासदांना दिले आहे. 

Post a Comment

0 Comments