वणीत ‘माजी आमदार केसरी कुस्ती’ महादंगल....
२८ मार्च ला वणीत देशभरातील नामांकित पुरुष-महिला पैलवानांचा थरार :- २१ लाखांच्या बक्षिसांसह कुस्ती महादंगल....
वणी :- सुरज चाटे
श्री रंगनाथ स्वामी यात्रेनिमित्त वणी येथे २८ मार्च रोजी भव्य “माजी आमदार केसरी कुस्ती महादंगल” आयोजित करण्यात आली आहे. या महादंगल मध्ये भारतातील नामांकित पुरुष व महिला पैलवान सहभागी होणार असून तब्बल २१ लाख रुपयांची लुट होणार आहेत. या कुस्ती महादंगलला क्रीडाप्रेमींसह कुस्ती शौकिनांमध्ये मोठे आकर्षण निर्माण झाले आहे.
ही महादंगल माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आली आहे. पांडुरंग लांजेवार यांच्या मार्गदर्शनात सदर कार्यक्रम होणार असून प्रमुख उपस्थिती तथा महत्त्वपूर्ण योगदान देत मनसे नेते राजू उंबरकर यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत.
ही स्पर्धा स्व. श्रीमती सुनंदा मधुकरराव उंबरकर स्मृती प्रित्यर्थ स्टेडियम, जत्रा मैदान, वणी येथे आयोजित करण्यात आली आहे. सकाळी कुस्ती फेऱ्यांना सुरुवात होणार असून रात्रीपर्यंत दंगल रंगणार आहे.
स्पर्धेत पुरुष गटात प्रथम पुरस्कार १ लाख रुपये (माजी आमदार केसरी बहुमान व स्व. ललित लांजेवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ चांदीची गदा), द्वितीय ७१ हजार, तृतीय ५१ हजार, चतुर्थ ४१ हजार व पाचवा ३१ हजार रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच इतर क्रमांका साठीही आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. तसेच महिला गटात प्रथम पुरस्कार २१ हजार व (स्व. संभाजी पोटदुखे यांच्या स्मृती प्रित्यर्थ चांदीची गदा) द्वितीय ११ हजार, तृतीय ७ हजार, चतुर्थ ५ हजार, पाचवा ४ हजार, सहावा ३ हजार व सातवा २ हजार रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
या महादंगलमध्ये राज्यातील तसेच देशभरातील कुस्तीपटू सहभागी होणार असून पारंपरिक कुस्तीचा थरार अनुभवण्याची संधी वणीकरांना मिळणार आहे. तसेच यात शंभर पासून तर हजारांच्या कुस्त्या लावण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन वणीकर क्रीडा प्रेमी नागरिक यांच्या वतीने करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.











0 Comments