वणीकरांसाठी आर्थिक विश्वासाचा नवा दीपस्तंभ; ‘माँ. जगदंबा नागरी सहकारी पतसंस्था’ची वणी शाखा गाडगे बाबा चौकात लवकरच जनतेच्या सेवेत...
कोअर बँकिंग, आरटीजीएस-एनईएफटी, लॉकर सुविधा आणि विविध कर्ज योजनांसह आधुनिक बँकिंग सेवा; बचत ठेव प्रतिनिधींसाठीही आकर्षक संधी....
सत्यभाषा वणी :- “माणसं हक्काची, पतसंस्था हक्काची, नाती हक्काची, वसा समृद्धीचा आणि वारसा कार्यतत्परतेचा” हे ब्रीद जपत माँ. जगदंबा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पांढरकवडा यांची नवी शाखा वणी शहरातील गाडगे बाबा चौक येथे लवकरच जनतेच्या सेवेत दाखल होत आहे. संस्थेच्या इतर तीन शाखांना मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आता वणीकरांना व विविध गावातील जनतेला आधुनिक व विश्वासार्ह आर्थिक सेवा उपलब्ध होणार आहेत.
या शाखेत ग्राहकांसाठी कोअर बँकिंग, एसएमएस बँकिंग, आरटीजीएस/एनईएफटी, लॉकर सुविधा, डिमांड ड्राफ्ट यांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध असतील. तसेच आवर्त ठेव योजना, मासिक योजना, दाम-दुप्पट योजना आणि मुदत ठेवींवर आकर्षक व्याजदर देण्यात येणार आहेत. याशिवाय नागरिकांच्या विविध गरजा लक्षात घेऊन वैयक्तिक कर्ज, तारण कर्ज, वाहन कर्ज, व्यवसाय कर्ज, सोने तारण कर्ज, गृह कर्ज तसेच रोख कर्ज मर्यादा अशा अनेक कर्ज योजनाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे वणी शहरातील नागरिकांना आर्थिक व्यवहारांसाठी विश्वासार्ह पर्याय उपलब्ध होणार आहे.
संस्थेच्या वतीने नागरिकांना गाडगे बाबा चौक येथील शाखेला भेट देऊन संस्थेच्या सेवा जाणून घेऊन सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. “माँ जगदंबा म्हणजे आर्थिक विश्वासातील दीपस्तंभ… आपल्या समवेत, आपल्या करिता सदैव” अशी भावना संस्थेच्या कार्यातून व्यक्त होत आहे. दरम्यान, संस्थेत दैनिक बचत ठेव व आवर्त ठेव प्रतिनिधी नेमण्यात येणार असून इच्छुकांनी त्वरित शाखेत संपर्क साधावा. अनुभवी व्यक्तींना प्राधान्य देण्यात येणार आहे.
संपर्क - सुरज रमेश चाटे, वणी शाखा व्यवस्थापक, शाखेचा पत्ता - गाडगे बाबा चौक वणी, मो. नं. 9518585970.









0 Comments