ADvt

ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात पती ठार पत्नी जखमी, बोरचांदली पुलावरील घटना


मुल :- मनीष रक्षमवार

    मूल तालुक्यातील बोरचांदली पुलावर ट्रॅक्टर दुचाकी अपघातात दुचाकीस्वार असलेले पतीचा जागीच मृत्यू झाला असुन पत्नी जखमी झाली आहे. तर ट्रॅक्टर चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना आज सकाळी 11 वाजता चे दरम्यान घडली.
     गणपत आगडे असे मृतकाचे नाव असून सुरेखा गणपत आगडे राहणार तेल्ली मोहल्ला मूल गंभिर जखमी असुन ट्रॅक्टर चालक किशोर गुणाजी पोरटे राहणार मुरखळा तालुका चामोर्शी हा किरकोळ जखमी आहे.
     मूल शहरातील गणपत आगडे आणि सुरेखा आगडे हे दोघे पती-पत्नी मूलवरून फिस्कूटीला महाकाली मंदिरात दर्शन घेण्याकरिता जात होते. दरम्यान बोरचांदली पुलावर थांबून पूजेचे साहित्य पुलावरून नदीत शिरवित असताना मागच्या बाजूने भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर घेऊन येत होता आणि पुलावर असलेल्ल्या आगडे दाम्पत्याला धडक दिली. यात पुलावर उभे असलेले गणपत आगडे यांचा मृत्यु झाला तर पत्नी जखमी झाली आहे. या अपघातात ट्रॅक्टर आणि दुचाकी पुलाच्या खाली पडल्याने ट्रॅक्टर चालक किरकोळ जखमी झाला आहे. जखमींना मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. 
     नवीन वर्षात झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे मूल शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास मूलचे ठाणेदार सतीश सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात मूल पोलीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments