ADvt

प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु व साडेसात लाखाच्या वर मुद्देमालासह एकास अटकवणी :- सुरज चाटे

यवतमाळ जिल्हयात अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना अवैध धंदयाविरुध्द प्रभावी कारवाई करण्याचे आदेशीत केले होते त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी त्यांचे अधिनस्त पथकांना अवैध धंदयाची गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सूचना दिल्या होत्या.

    दिनांक ३०/०१/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पो.स्टे. वणी परीसरात असतांना गोपणीय बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की, एक सिल्वर रंगाची हुंडाई कंपनीची वरणा कार महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधीत तंबाखू व गुटखा घेवुन लाल पुलीया मागे वणी शहरात दाखल होणार आहे. अशी विश्वसनिय माहिती प्राप्त झालेवरून स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने देश प्रेमी धाबा चिखलगांव वणी येथे रोडवर रात्रीपासून नाकाबंदी लावून थांबले असतांना नाकाबंदी दरम्याण गोपनीय माहिती प्रमाणे वर्णन असलेली एक सिल्वर रंगाची हुंडाई कंपनीची वरणा कार क्रमांक एम.एच.३४ ए.ए. ७७६६ ही दिसुन आल्याने पोलीस स्टाफचे मदतीने सदर वाहनास थांबवुन वाहनचालकास त्याचे नांव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नांव अब्दुल नदीम अब्दुल मोबीन वय ३० वर्ष. रा. साई नगरी बणी ता. वणी जि. यवतमाळ असे सांगीतल्यानं पंचासमक्ष त्याचे वाहनाची झडती घेतली असता १) मजा १०८ हुक्का शिशा सुगंधीत तंबाखुचे २०० ग्राम क्षमतेचे १६० नग, २) क्रेज़ सुगंधीत तंबाखुचे ४५० ग्राम क्षमतेचे २२ नग, असा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधीत तंबाखू व आरोपीचे अंगझडतीत ०१ मोबाईल मिळून आल्याने सदर मुददेमाल व मुददेमाल वाहून आणन्याकरीता वापरात आणलेले वाहन असा एकुण ७,६२,३००/- रुपये किमतीचा मुद्देमाल व आरोपी अब्दुल नदीम अब्दुल मोबीन वय ३० वर्ष, रा. साई नगरी वणी ता. वणी जि. यवतमाळ यास ताब्यात घेवून अन्न सुरक्षा अधिकारी यवतमाळ यांना सदर बाबतीत माहोती देवून पाचारण केले असता आज दिनांक ३१/०१/२०२३ रोजी अन्न सुरक्षा अधिकारी श्री घनश्याम देदे अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यवतमाळ यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपी अब्दुल नदीम अब्दुल मोबीन वय ३० वर्षे, रा. साई नगरी वणी ता. वणी जि. यवतमाळ याच विरुद्ध पोस्ट वणी येथे भादंवि तसेच अन्न सुरक्षा मानके कायदा २००६, नियम व नियमणे २०११ चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्हयात कोठेही असा प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु अथवा गुटखा विक्री होत असल्यास किंवा त्याचा साठा करून ठेवला असले बाबत माहिती प्राप्त झाल्यास त्याबाबतची माहीती स्थानिक गुन्हे शाखेला कळविण्यात यावी असे आवाहन जिल्हा पोलीस दला तर्फे करण्यात येत आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुश जगताप, श्री. प्रदीप परदेशी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सपोनि अमोल मुडे, पोहवा उल्हास कुरकुटे, सुनिल खंडागळे, पोना सुधीर पिदुरकर, सुधीर पांडे, चापना सतिष फुके सर्व स्थागुशा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Post a Comment

0 Comments