ADvt

आणखी एका शेतकऱ्याची विषारी औषध प्राशन करून आत्महत्यायवतमाळ (वणी) :- सुरज चाटे

मारेगाव तालुक्यातील आत्महत्येचा आलेख वाढतच चालला असून दिनांक 05 जानेवारी 2023 ला रात्री 8 वाजताच्या दरम्यान पुन्हा एका अल्पभूधारक शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून जीवनाची यात्रा संपवल्याची उघडकीस आली.

प्रमोद वेंकटेश एकरे (43) रा. रामेश्वर असे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दिनांक 5 ला सकाळी शेतातील तूर कापण्यासाठी गेलेला प्रमोद संध्याकाळ झाल्यानंतरही घरी न परतल्याने त्याचा शोध घेतला असता शेतातील गोठ्यात विषारी औषध प्राशन करून मृतावस्थेत आढळला. त्यांच्या आत्महत्येचे कारण अजून कळू शकले नसून उत्पन्न कमी त्यात कर्जाचा डोंगर यामुळे त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे का? असा कयास लावल्या जात असुन. गावात एकच खळबळ पसरली असून एकरे परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. त्याचे पच्छात आई वडील पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे. 

Post a Comment

0 Comments