ADvt

Breaking News यवतमाळमध्ये दोन डॉक्टरांवर चाकूने प्राणघातक हल्लायवतमाळ :- सुरज चाटे

यवतमाळमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 2 प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर रुग्णाने चाकूने दिनांक 5 जानेवारी 2023 ला सायंकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यानंतर मोठी खळबळ उडाली. दोन्ही डॉक्टर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मुद्यावर यवतमाळमधील निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. याआधीदेखील डॉक्टर अशोक पाल यांची हत्या झाली होती. या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे. 
    यवतमाळमधील शासकीय रुग्णालयात संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. प्रशिक्षणार्थी डॉक्टर वॉर्ड क्रमांक 24 मध्ये राऊंडवर होते. त्यावेळी रुग्णाने चाकूने प्राणघातक हल्ला केला. या घटनेनंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.  डॉक्टर अभिषेक झा आणि डॉक्टर जेबीस्टन पॉल अशी जखमी डॉक्टरांची नावे आहेत.

Post a Comment

0 Comments