ADvt

हंसराजजी अहिर यांच्या हस्ते श्री शरद इंगळे यांचा सेवापूर्ती सत्कारवणी :- सुरज चाटे

     श्री शरद प्रल्हादराव इंगळे पदवीधर शिक्षक हे दिनांक 31/12/ 2022 रोजी जि प शाळा,शिरपूर प स वणी येथून सेवानिवृत्त झाले .त्या प्रित्यर्थ दिनांक 7/1/2023 रोजी बाजोरिया हॉल वणी येथे इंगळे परिवाराचे वतीने सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले  या कार्यक्रमात राष्ट्रीय ओ बी सी आयोगाचे अध्यक्ष श्री हंसराजजी भैया अहिर यांचे हस्ते श्री शरद इंगळे सर यांचा शॉल , श्रीफळ व मानचिन्ह देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला .याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री हंसराज भैया अहिर , स्वागताध्यक्ष वणी विधानसभा संघाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार ,प्रमुख अतिथी  राजुदासजी जाधव कार्याध्यक्ष म रा पतसंस्था फेडरेशन ,टिकारामजी कोंगरे अध्यक्ष यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सह बँक ,डॉ मोरेश्वरराव पावडे सचिव ग्रामविकास संस्था रासा, संजय पिंपळशेंडे मा. सभापती पं.स. वणी, गोपालराव बिरे जावई हे होते. 


      या प्रसंगी कार्यक्रमाचे संचलन मधुकर कोडापे प्रास्ताविक शुभम शरद इंगळे तर आभार प्रदर्शन संतोष सांबरे यांनी केले याप्रसंगी शरद इंगळे , सौ सुनिता इंगळे ,गोपालराव बिरे यांनी मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख अतिथी यांनी इंगळे सरांना सेवापूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या 
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे , दिनकर पावडे , पुरुषोत्तम आवारी , विजय पिदूरकर सर्व शिक्षक व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी , शिक्षक व मित्र परिवार , चिखलगाव ग्रामवाशी व नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

Post a Comment

0 Comments