ADvt

अवैध कोंबड बाजारावर पोलिसांची धाड13 आरोपी सह एकुण ३ लाख ३८ हजार ४३०रू चा माल जप्त

मुल :- मनीष रक्षमवार 

      आज दि. ०८/०१/२०२३ रोजी पो स्टे मुल ' जि चंद्रपुर येथे पोउपनि पुरुषोत्तम राठोड, नापोअं चिमाजी देवकत्ते, पोअं/गजानन, पोअं संजय, पोअं अंकुश, चालक पोअं स्वप्नील असे मिळून पो स्टे मुल परिसरात प्रोव्ही रेड, जुगार रेड पेट्रोलिंग करीत असताना मौजा मंदा तुकूम गावाशेजारी तलावाजवळ जंगलात काही इसम अवैद्यरित्या कोंबडयाची झुंज लढवून पैशाची बाजी लावून हारजितचा जुगार खेळ खेळीत आहे. 
     अशी माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी आज दिनांक ०८/०१/२०२३ चे सायंकाळी ०५:०० वा दरम्यान छापा मारला असता तेथे नामे १) राहुल गजानन धोंगडे, वय ४७ वर्ष रा. पळसगांव ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर, २) सचिन सुधाकर वासाडे, वय ३५ वर्ष रा. आमडी ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर, ३) अरविंद सुंदरशाहा सिडाम, वय ३७ वर्ष रा. कवडजई ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर, ४) चैतन्य विलास डाहूले, वय २२ वर्ष रा. इंदीरानगर, चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर, ५) रमेश साधुजी बलकी, वय ३३ वर्ष रा. इंदीरानगर, चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर, ६) मनोज बंडु महाकुलकर, वय ३२ वर्ष रा. इंदीरानगर, चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर, ७) बिंदुशिल वनवास राऊत, वय ३२ वर्ष रा. इंदीरानगर, चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर, ८) घनशाम गोपाळराव मोरे, वय ३९ वर्ष रा. इंदीरानगर, चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर, ९) विलास भगवान शेडमाके, वय ४० वर्ष रा. वार्ड क्र १३, सावली, ता सावली जि. चंद्रपूर, १०) ओमप्रकाश मधुकर मोहूर्ले, वय ४० वर्ष रा. वार्ड क्र १३, सावली, ता सावली जि. चंद्रपूर, ११) नागेश गोविंदा मांदाळे, वय ४० वर्ष रा. वार्ड क्र १२, सावली, ता सावली जि. चंद्रपूर, १२) आनंद लक्ष्मण चलकलवार, वय ६५ वर्ष रा. वार्ड क्र १४, सावली, ता सावली जि. चंद्रपूर, १३) उत्तम पुरुषोत्तम मोहूर्ले, वय ४० वर्ष रा. वार्ड क्र १२, सावली, ता सावली जि. चंद्रपूर असे कोंबडा जुगार खेळताना मिळून आले असून त्यांच्या ताब्यातून ४ जखमी कोंबडे, नगदी २४३० /- रू ७ अॅन्ड्रॉईड मोबाईल व ६ मोटार सायकल असा एकूण ३,३८,४३० /- रू चा माल जप्त करून आरोपी विरुदध गुन्हा नोंद करण्यात आला.
     सदर कारवाई उप विभागिय पोलिस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे व पो नि सतीशसिंह राजपूत  यांच्या मार्गदर्शनात पोउपनि पुरूषोत्तम राठोड, नापोअं चिमाजी देवकते पोअं गजानन तुरेकर, संजय जुगनाके, अंकुश मांदाळे व स्वप्नील खोब्रागडे पो स्टे मुल यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments