ADvt

वणी - वरोरा रोडवर भीषण अपघातात एकाचा मृत्यूवणी :- सुरज चाटे

    वणी वरोरा रोडवर दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात होऊन एकाचा मृत्यू तर दुसरा चालक गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 02 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली.


        मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी आठ वाजता वरोरा रोडवर नायगाव जवळ पेट्रोल पंपाच्या समोर अपघात झाला. वणी कडून जाणारा ट्रक व वरोरा कडून येणारा ट्रक हे एकमेकाना समोरा समोर धडकल्याने एका ट्रक मधील चालक हा जागेवर मरण पावला असून एक चालक गंभीर आहे, ही माहिती वणी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले ड्रायवर चे नावे अजूनतरी कळुशकले नसून मृतकाचे शव वणी ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेणाकरिता आणण्यात आले आहे. वृत्त लिहे पर्यंत त्यांचे नाव व गावाची माहिती मिळाली नाही. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments