ADvt

नातं विश्वासच नातं रक्ताचं, रक्तदान हेच श्रेष्ठ दाननातं विश्वासाच नातं रक्ताचं, रक्तदान हेच श्रेष्ठ दान....

प्रमोद भाऊ वासेकर यांच्या जन्मदिनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन...

वणी :- सुरज चाटे

    येथील वसंत जिनिंग चे संचालक व कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद भाऊ वासेकर यांच्या जन्मदिनानिमित्त वणी तालुक्यातील मानकी येथे दिनांक 3 फेब्रुवारी 2023 ला सकाळी 11  वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 
     तसेच गावा मध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मानकी गावातील नागरिक व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.  आज कर्करोग, सिकलसेल आणि विविध आजार मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यांना रक्ताची गरज असते, त्यामुळे सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान श्रेष्ठ दान समजून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे. तसेच कोणत्याही रुग्णांना रक्त मिळाले पाहिजे, कोणत्याही रुग्ण रक्त न मिळता त्याचा मृत्यू होऊ नये म्हणून प्रमोद वासेकर यांनी रक्त हे काळाची गरज म्हणून हे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामुळे ग्रामीण भागात जनजागृती झाली पाहिजे यासाठी हे शिबीर घेण्यात येत असुन मोठ्या प्रमाणात युवकांनी समोर येऊन रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments