ADvt

घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारा सह एकुण पाच घरफोडी व दोन मोटर सायकल चे गुन्हे उघडघरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारा सह एकुण पाच घरफोडी व दोन मोटर सायकल चे गुन्हे उघड....

गुन्हे शाखेची कारवाई :- चोरी, घरफोडी, मोटर सायकल चोरी करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर....

यवतमाळ :- सुरज चाटे

    यवतमाळ जिल्हयात वाढत्या चोरी, घरफोडी, मोटर सायकल चोरी चे गुन्हयांना प्रतिबंधक करण्यासाठी व घडलेल्या गुन्हे उघडकीस आणण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना आदेशीत केले होते त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी त्यांचे अधिनस्त पथकांना अभिलेखावरील गुन्हेगारांची गोपनिय माहीती काढुन गुन्हे उघडकीस आणने बाबत सुचना दिल्या होत्या.     दिनांक ०१/०२/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यांचे आदेशानुसार स्थागुशा चे पथक पेट्रोलींग करीत असतांना माहीती मीळाली की, नेताजी नगर येथे राहणारा घरफोडी चा सराईत गुन्हेगार नामे अक्षय दयाराम मसराम हा चोरीच्या अॅक्टीवा मोपेडवर टिव्ही घेवुन वनवासी मारोती आर्णी रोड येथे उभा अशा खात्रीशीर माहितीवरून स्थागुशा चे पथकाने वनवासी मारोती मंदीर परिसरात सापळा रचुन इसम नामे अक्षय दयाराम मसराम वय २८ वर्ष रा. नेताजी नगर, यवतमाळ यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता सदर इसमाने त्याचे फरार असलेले साथीदार नामे १) शेख अकबर शेख मुसा रा. कलगांव ता. दिग्रस २) शेख अख्तर शेख मुक्तार रा. पुसद, ३) लखन देविदास राठोड वय २५ वर्ष रा. मोरगव्हाण ता. दिग्रस यांचे सोबत मीळुन पोलीस स्टेशन आर्णी येथे तिन घरफोडी, पोलीस स्टेशन अवधुतवाडी येथे दोन घरफोडी, व पो.स्टे. लोहारा हद्दीतील दोन मोपेड असे एकुण सात ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिल्याने आरोपीचे ताब्यातुन १) एक एल.ई.डी. टिव्ही २) तिन मोपेड वाहन ३) गुन्हयात चोरीस गेलेली एक अमेरीकन टुरीस्टर बॅग ४) एक मोबाईल फोन ५) घरफोडी करण्यासाठी वापरलेली टॉमी असा एकुण १,७६,५००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पुढील कारवाई करीता पोलीस स्टेशन आर्णी यांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास पोलीस स्टेशन आर्णी हे करीत आहेत.

     सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुष जगताप, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनात श्री. प्रदीप परदेशी पो. नि. स्थागुशा, सपोनि विवेक देशमुख, पोउपनि राहुल गुहे, पोहवा बंडु डांगे, साजीद शेख, अजय डोळे, नापोशी निलेश राठोड, रितुराज मेडवे, विनोद राठोड, पोशी धनंजय श्रीरामे, पोशी रजनिकांत मडावी, चालक अमीत कुमरे सर्व स्थागुशा यांचे पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे.


-----------------------

Post a Comment

0 Comments