ADvt

विमलबाई दुधलकर यांचे दुःखद निधन....वणी :- सुरज चाटे
     वणी शहरातील रंगनाथ नगर येथील रहिवासी असलेली श्रीमती विमलबाई आनंदरावजी दुधलकर वय 73 वर्ष यांचे दिनांक 26 फेब्रुवारी 2023 ला दुपारी 3.47 वाजताच्या दरम्यान दुःखद निधन झाले. 

     वणीतील सुतार समाजाचे माजी प्रचार मंत्री किसन आनंदरावजी दुधलकर व शहरातील प्रसिद्ध खाजगी इमारत बांधकाम कंत्राटदार ज्ञानेश्वर आनंदरावजी दुधलकर यांची आई श्रीमती विमलबाई आनंदरावजी दुधलकर वय 73 वर्ष यांची काही दिवसांपासून शारीरिक प्रकृती बिघडली होती दरम्यान त्यांना सुगम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, दिनांक 26 फेब्रुवारी 2023 ला दुपारी 3.47 वाजताच्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरी रंगनाथ नगर येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थविवावर दिनांक 27 फेब्रुवारी 2023 ला सकाळी 10 वाजताच्या दरम्यान वणी येथील मोक्षधाम येथे अंत्यविधी होणार आहे. त्यांच्या मागे 2 मुलं, मुलगी, नातवंड व बरचमोठा आप्त परिवार आहे, त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

Post a Comment

0 Comments