ADvt



वणी :- सुरज चाटे

    स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळची कारवाई दिनांक २६/०२/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक अवैध धंदे व संपत्तीविषयक गुन्हेगारांची माहिती घेणेः करौता पो.स्टे. वणी परीसरात असतांना गोपणीय बातमीदाराकडुन खात्रीलायक माहिती मिळाली की, गोवंश जातीची जनावरे अवैधरित्या कोंबून कतलीकरिता वरोरा, वणी, मुकुटबन मार्गे अदिलाबादकडे घेवुन जात आहेत. 
     अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यावरुन स्थागुशा कडील पथकाने माहिती प्रमाणे घोन्सा फाटा चौफुली येथे नाकाबंदी लावून रात्री २१/०० वा सुमारास भरधाव वेगात येणारे एका पिकअप वाहनाला थांबवीले असता त्याचे मागेच लागोपाठ इतर पाच वाहने आल्याने त्या सर्व वाहनांना पोलीस स्टाफ चे मदतीने थांबवून सोबत असलेल्या पंचासमक्ष सदर वाहनांची पाहाणी केली असता प्रत्येक वाहनामध्ये गोवंशीय बैल एकमेकांचे पायाला आखुड दोराने बांधुन निर्दयतेने व क्रुरपणे चारापाण्याची व्यवस्था न करता कोंबल्याची दिसून आल्याने १) वाहन क्रमांक एम एच २९ बी ई ५९२४ टाटा एस चालक जुबरान शेख अकील शेख वय २३ वर्षे, रा. रंगनाथ नगर वणो, २) एम एच ३४ ए बी ९१६६ पिकअप बोलेरो चालक स्वप्नील हनुमान तुराळे वय २७ रा. वाठोडा ता. बरोरा जि. चंद्रपुर, ३) एम. एच. ३२ क्यु ३९७० पिकअप बोलेरो चालक मंगेश प्रकाश देठे वय २५ रा. खंबाडा ता. वरोरा जि. चंद्रपुर ४) एम एच २९ ए टी ०६८८ पिकअप बोलेरो चालक गणेश मेघशाम खेवले वय २९ वर्ष, रा. जामणी बु ता. वरोरा जि. चंद्रपुर ५) एम एच ३४ बी जी १०६५ पिकअप बोलेरो चालक पांडुरंग लक्ष्मण देवळकर वय ३८ रा. - जामणी बु ता. वरोरा जि. चंद्रपुर. ६) एम एच ३४ बी जी १८७० पिकअप बोलेरो चालक सारंग मंगल दरेकर वय ४२ वर्षे, रा. डोंगरगाव रेल्वे ता. वरोरा जि. चंद्रपुर अशा सहा वाहनातून एकुण १८ जनावरे व वाहन असा एकुण ३४,४०,०००/- रूपयाचा मुददेमाल ताब्यात घेवुन नमुद आरोपीतांकडे केलेल्या चौकशीत सदरची जनावरे १) शामा काळे वय अं ४० वर्षे, रा. येनसा ता. वरोरा जि. चंद्रपुर २) निलेश कोल्हे वय अं ३० वर्ष, रा. सावली (बाघ) ता. हिंगणघाट यांचे सांगणेवरुन वाहतुक करीत असल्याचे सांगीतले. ताब्यात घेण्यात आलेल्या जनावरांची श्री. गुरु गणेश गौशाला वणी येथे व्यवस्था करण्यात आली व आरोपीतांविरुध्द पो.स्टे. वणी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.स्टे. वणी कडुन सुरु आहे.

     सदरची कारवाई संपवुन परत येत असतांना मिळालेल्या गोपणीय खबरे वरुन वणी येथुन रासा येथे एक मोपेड क्र. एम एच २९ बि.ए. १९२८ वरुन दोन पाढन्या रंगाचे चुंगडी मध्ये अवैध दारु घेवुन जाणारा सौरभ किशोर नगराळे वय २२ रा. राजुर कॉलणी वणी यास ताब्यात घेवुन त्याचे कब्जातुन रुपेश संत्रा देशी दारुचे चार बॉक्स असा वाहनासह ४३,४४०/- रु चा मुददेमाल जप्त करून कारवाई नोंद करण्यात आली.

    सदरची कारवाई ही सर्व वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शनात सपोनि अमोल मुडे, पोउपनि योगेश रंधे, पोहवा योगेश उगवार, पोना सुधिर पांडे. सुधिर पिदुरकर, निलेश निमकर, पोको रजनिकांत मडावी, चापना सतिश फुके सर्व स्थागुशा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Post a Comment

0 Comments