ADvt

विदर्भ निर्माण यात्रेचे वणी शहरात भव्य स्वागतवणी :- सुरज चाटे

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने २१ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२३ पर्यंत पूर्व विदर्भातून काळेश्वर सिरोंचा ते नागपूर व पश्चिम विदर्भातील जिजाऊ चे माहेरघर सिंदखेडराजा (बुलढाणा) ते नागपूर अशी दुसरी विदर्भ यात्रा निघाली आहे.या दोन्हीही यात्रेचा समारोप ५ मार्च २०२३ रोजी, नागपूर येथील संविधान चौकात होणार आहे.
पुर्वेकडील विदर्भ निर्माण यात्रा गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यांना भेटी देत चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा,गडचांदूर,जिवती, कोरपना,मार्गे ही यात्रा २४ फेब्रुवारी रोजी शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकात येणार आहे.यावेळी या यात्रेचे जंगी स्वागत होऊन या ठिकाणी सभा होणार आहे.
     या यात्रेचे स्वागत करण्यासाठी शहरातील मान्यवर नेते डॉ.भालचंद्र चोपणे,प्रदीप बोनगिरवार, जयसिंग गोहोकार,इजाहर शेख, राजाभाऊ पाथ्रडकर, किरणताई देरकर, वंदना आवारी,संध्याताई बोबडे,कॉ.अनिल घाटे, मंगल तेलंग,अजय धोबे, विजय नगराळे,प्रा.दिलीप मालेकार, अनिकेत चामाटे सह शहरातील इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी बेरोजगारांच्या रोजगारासाठी, शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी, सिंचन आणि इतरही क्षेत्रातील अनुशेष पूर्ण करण्यासाठी, विदर्भाचे स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण होणे काळाची गरज आहे विदर्भ प्रेमी जनतेनी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. पुरुषोत्तम पाटील, रफिक रंगरेज, राहुल खारकर, देवराव धांडे पाटील प्रा.बाळासाहेब राजुरकर, नामदेव जेनेकर, राजू पिंपळकर, संजय चिंचोलकर, अमित उपाध्ये, विजया आगबत्तलवार, शालिनी रासेकर, कलावती शिरसागर, अलका मोवाडे, सुषमा मोडक, दशरथ बोबडे, देवा बोबडे,सृजन गौरकार, धीरज भोयर,मुक्तानंद भोंगळे,संदीप गोहोकर,पुंडलिक पथाडे, व्हि.बी.टोंगे,उलमाले,यांचेसह विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केले.

Post a Comment

0 Comments