ADvt

बामणी फाट्या जवळ भयावह अपघात, शरीर झाले छिन्न विछिन्न..कामगारावर काळाचा घाला :- ट्रकच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू .... 

वणी :- सुरज चाटे

     येथील ब्राह्मणी फाट्या नजीक दिनांक 20 फेब्रुवारी 2023 ला सायंकाळी 9.25 वाजताच्या दरम्यान भयावह अपघात घडला यात एका अनोळखी टिप्पर/ट्रक ने एका वणीतील इसमास धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना घडली दरम्यान टिप्पर/ट्रक ची धडक इतकी जोरदार होती की त्यात एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला. 
    वणी येथील तलाव रोड परिसरात वास्तव्यास असलेले किसन उद्धव पारखी, वय अं 55 वर्ष हे ब्राह्मणी रोड वर असलेले साई कृपा जिनिंग मध्ये कामावर होते दरम्यान आपले कर्तव्य बजावून ते दिनांक 20 फेब्रुवारी 2023 ला रात्री 9.25 वाजताच्या दरम्यान घरी परत येत असताना एका अनोळखी टिप्पर/ट्रक ने जोरदार धडक दिली त्यात किसन पारखी हे जागीच ठार झाले, त्यांचे शरीर छिन्न विछिन्न झाले होते दरम्यान त्यांचे शव उत्तरीय तपासणी साठी वणी ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले असुन वृत्त लिहे पर्यंत अनोळखी ट्रक चा शोध लागला नव्हता. पुढील तपास वणी पोलीस करीत असून, त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.  त्यांच्या मागे पत्नी, 2 मुली जावई, एक मुलगा व बराच मोठा आप्त परिवार आहे. 


Post a Comment

0 Comments