ADvt

धारदार सत्तुर घेवुन घुमाकुळ घालणाऱ्या युवकास सत्तुरासह अटक


                         संग्रहीत छायाचित्र

यवतमाळ :- जिल्हयात कलम ३७ (१) (३) महा पोलीस कायदा अन्वये प्रतिबंधीत आदेश लागू तरीही...

वणी :- सुरज चाटे

     मा. जिल्हा दंडाधिकारी सा. यवतमाळ यांचा संपुर्ण यवतमाळ जिल्हयात कलम ३७ (१) (३) महा पोलीस कायदा अन्वये दिनांक १३/०२/२०१३ चे ००/०१ वा. ते २७/०२/२०२३ चे २४/०० वा. पर्यंत प्रतिबंधीत आदेश लागू असतांना मुखबीर कडुन मिळालेल्या खबरें प्रमाणे इसम नामे साहील संजय कामटकर, 19 वर्ष हा आपल्या हातात लोखंडी धारदार सत्तुर घेवुन घुमाकुळ घालीत असतांना दिनांक १८/०२/२०२३ चे १८/३० वा. मिळुन आला त्याचे जवळ एक लोखंडी मुठ असलेला धारदार सत्तुर जप्त करण्यात आला. सदर इसमा विरूध्द अप. क. १९८ / २०२३ कलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा सहकलम १३५ म. पोका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला
     सदरची कार्यवाही मा. डॉ. पवन बंसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. संजय पुज्जलवार उप.वि.पो.अ. वणी, पो.नि प्रदिप शिरस्कर ठाणेदार पो.स्टे. वणी यांचे मार्गदर्शनात, डी.बी पथक चे सपोनि माधव शिंदे, सफौ. / १५९७ सुदर्शन वानोळे पोहवा / १२७४, सुहास मंदावार, पोना / १६८७ विठल बुरुजवाडे, पोना / ६८७ हरीन्द्रकुमार भारती, पोकों / २०६० सागर सिडाम, पोकाँ/ ४४७ पुरूषोत्तम डडमल यांनी केली. 

Post a Comment

0 Comments