ADvt

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या...गणपत ने इतकी मोठी टोकाची भूमिका का घेतली?

यवतमाळ :- सुरज चाटे
     यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात येणाऱ्या चोपण येथील शेतकरी नामे गणपत अय्या आत्राम वय अं 58 वर्ष याने दिनांक 04 फेब्रुवारी 2023 ला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुपारच्या (दुपारी 3 च्या सुमारास) दरम्यान उघडकीस आली. 

     मारेगाव तालुक्यातील चोपण येथील शेतकरी गणपत अय्या आत्राम, वय अंदाजे 58 वर्ष हे मागील अनेक वर्षापासून राहत होते. येथेच त्यांनी शेती घेऊन घर बांधून स्थायिक झाले होते. शेती म्हटल्यावर विविध अडचणी यात विविध विवंचनेत असलेले गणपत हे दुपारी शेतामध्ये गेले. पत्नीला तू मागावून ये, मग आपण कुटार काढू असे सांगितले. शेतात असलेल्या कडुनिंबाच्या झाडाला दोराच्या साहाय्याने गळफास घेतला. आणि जीवनयात्रा संपवली. पत्नी मागून आल्यानंतर तीला कडुनिंबाच्या झाडाला पती लटकून असलेला दिसला.
     गणपत यांचा एक मुलगा काही वर्षांपूर्वीच मरणं पावला. तर दुसरा मुलगा हार्दिक थोडा मानसिक रुग्ण असल्याची माहिती आहे. तालुक्यात होत असलेल्या  आत्महत्या हा आता चिंतनीय विषय झाला असून या आत्महत्यांना आळा कसा बसेल? यावर उपाय शोधणे गरजेचे झाले आहे. गणपत यांच्यामागे पत्नी एक मुलगा आणि एक विवाहित मुलगी असा आप्तपरिवार आहे. वृत्त लिहिपर्यंत पंचनामा व्हायचा होता.

Post a Comment

0 Comments