ADvt

उदयपाल महाराज यांना संत गाडगेबाबा प्रबोधनकार पुरस्कार



वणी: राजु गव्हाणे

     येथील सप्तखंजिरी वादक उदयपाल वणीकर यांना संत गाडगेबाबा प्रबोधनकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील घाटकुळ इथे हा सोहळा झाला.
तिथे राष्ट्रसंत टुकड़ोंजी महाराज विचार कृति सम्मेलन झाले. या  संमेलनातील एका समारंभात आयोजन समितीच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उदयपाल वणीकर हे मायनिंग इंजिनियर आहेत. 
    सत्यपाल महाराज यांच्या प्रेरणेतून ते गेल्या अनेक वर्षांपासून प्रबोधनात्मक कीर्तन करीत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि बहुजन महामानवांचे विचार समाजात पेरण्याचे काम ते अहोरात्र करीत आहे. वर्धा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सत्यपाल महाराजांच्या कार्यक्रमात त्यांनी साथ संगत केली आहे. आपल्या पुरस्काराचे श्रेय ते सत्यपाल महाराज वडील अरुणराव वाढई आई अनुराधा वाढई यांना देतात. या पुरस्कार सोहळ्यानंतर त्यांचे सप्त खंजिरी प्रबोधनात्मक किर्तन झाले. या कीर्तनात त्यांना रोशन चांदेकर, अजय मडावी, दिनेश, प्रशांत ठाकूर, कार्तिक येरणे यांनी साथ केली. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments