ADvt

युवा सेनेचा दणका आणि खुले झाले बंद असलेले मुत्रीघराचे दार..



गेल्या काही दिवसांपासून बंद असलेले मुत्रीघरा बाबत युवासेनेने निवेदन देत वेधले होते पालिका प्रशासनाचे लक्ष

वणी :- सुरज चाटे

     वणीच्या मुख्य बाजारपेठ परिसरात असलेल्या गांधी चौकात मागील 40 ते 50 वर्षां अगोदर पासून सुरू असलेले पुरुष मुत्रीघर गेल्या महिनाभरापासून कोणतीही जाहिरात न काढता नगर परिषदेकडून बंद करण्यात आले होते व नगर परिषदेकडून या मुत्रीघरासमोर कुलूप लावून नगर परिषद आरोग्य विभागाच्या मागे असलेले मुत्रीघर वापरण्यात यावे असे बोर्ड लावण्यात आले होते. 
     परंतु हे मुत्रीघर मुख्य बाजारपेठेपासून थोडे दूर आहे. ज्यामुळे व्यापारी वर्ग आपले दुकान सोडून तितक्या दूर जाऊ शकत नाही. शिवाय हे मुत्रीघर अनेक वर्षांपासून सुरू होते. हे मुत्रीघर बंद करण्याच्या मागे मुत्रीघराची दुर्गंधी येत असल्याचे कारण देण्यात येत होते. परंतु इतक्या वर्षांपासून नाही मग आताच ही दुर्गंधी येत आहे काय? जर दुर्गंधी येत असेल तर ते स्वच्छ करण्याचे काम हे नगर परिषदेचे आहे त्यामुळे युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्यासह शिवसैनिकांनी त्याची तात्काळ विल्हेवाट लावण्याची मागणी केली होती शिवाय या ठिकाणी एक पाण्याची टाकी लावण्यात येण्याची मागणी सुद्धा या निवेदनातून करण्यात आली होती. 
     त्याचीच दखल घेत पालिका प्रशासनाने अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असलेले मुत्रीघराचे अखेर दारे खोलण्यात आले असुन ये जा करणाऱ्यांना व बाजार हटाकरिता येणाऱ्या लोकांना व व्यापारी वर्गाला हे मुत्रीघर सोयीचे झाल्याचे परिसरातून ये जा करणाऱ्यांकडून बोलल्या जात आहे. 

Post a Comment

0 Comments