अवैध रित्या घातक शस्त्र बाळगणाऱ्या दोघास अटक
२ धारदार तलवारी केल्या जप्त :- दहशत निर्माण करण्याच्या इरादयात होते आरोपी
वणी :- सुरज चाटे
दिनांक १०/०३ /२०२३ रोजी वणी येथे स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाला रंगनाथ नगर, खरबड़ा मोहल्ला येथे राहणारा इसम नामे रोहीत खरे हा घातपात करण्याचे व दहशत निर्माण करण्याचे इरादयाने आपले घरात घातक शस्त्र बाळगुन असल्याची गोपणीय माहिती प्राप्त झाली त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने लागलीच रंगनाथ नगर, खरबड़ा मोहल्ला येथे पोहचुन इसम नामे रोहीत राकेश खरे वय २० वर्ष याचे घरी जावुन पंचासमक्ष त्याचे घराची झडती घेतली असता ०२ धारदार तलवारी मिळुन आल्या त्याला तलवारी कोठुन आणल्या याबाबत विचारपुस केली असता त्याचेच मोहल्यात राहणारा नामे अयान मनसुरी शवकत अली वय १९ याच्या असुन त्याने घरी ठेवण्यासाठी दिल्याचे सांगीतले त्यावरुन आरोपी १) रोहीत राकेश खरे वय २० वर्ष, ०२) अयान मनसुरी शवकत अली वय १९ वर्षे दोन्ही राहणार रंगनाथ नगर, खरबड़ा मोहल्ला वणी यांना ताब्यात घेवुन त्यांचेजवळुन ०२ लोखंडी धारदार तलवारी किंमत १०००/ रुपयाचा मुददेमाल जप्त केला व आरोपी यांना पुढील कार्यवाही कामी पो.स्टे. वणी यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई ही सर्व वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शनात सपोनि अमोल मुडे, पोहेका सुनिल खंडागळे, पोना/ सुधिर पिदुरकर, सुधिर पांडे, पोशी रजनिकांत मडावी, चालकपोहवा नरेश राउत सर्व स्थागुशा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
0 Comments