ADvt

Breaking Accident वणी वरोरा रोडवर भिषण अपघात







अपघातात वणी ग्रामीण रुग्णालयातील डॉ अश्विनी गौरकार (झाडे) यांचा जागीच मृत्यु....

वणी :- सुरज चाटे

   वणी वरोरा रोडवर, वरोऱ्याहून वणीच्या दिशेने येत असलेल्या वणीतीलच एका डॉक्टर दाम्पत्याच्या चारचाकी वाहनाला ट्रक ने धडक देऊन यात पत्नी जागीच ठार तर पती गंभीर झाल्याची घटना दिनांक 22 मार्च 2023 ला दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. 
        वरोरा - वणी रोडवर भीषण अपघात झाला यात वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दोन दिवसा अगोदरच रुजु झालेल्या डॉ. अश्विनी गौरकार- झाडे, वय अं 31 वर्ष, रा शाळा क्रमांक 5 वणी यांचा घटनास्थळी मृत्यू झाला असुन त्यांचे पती डॉ. अतुल गौरकार हे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. ते वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे कर्तव्य बजावत होते. डॉक्टर दाम्पत्य MH-34- AM- 4240 या कार ने वणीकडे येत होते तर ट्रक क्रमांक MH- 34- BZ- 2996 हा ट्रक भरधाव वेगात होता. नेमका अपघात झाला कसा हे समजायला मार्ग नसून मात्र, अपघात भीषण होता, यावेळी स्थानिकांनी गर्दी केली होती, दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस दाखल झाले व जखमींला तातडीने पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. 
     घटनेचा पुढील तपास पोलीस करीत असून घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.  मृतक डॉ. अश्विनीला एक वर्षाचे लहान बाळ आहे, तिच्या मागे मुलगा, पती व बराच मोठा आप्त परिवार आहे. 

Post a Comment

0 Comments