ADvt

वणी नगरपरिषदेचा लाचखोर आरोग्य निरीक्षक व पुरवठा स्वच्छता अभियंता ACB च्या जाळ्यात....बिल काढण्यासाठी मागितली होती पैशाची लाच :- आतातरी नगर परिषदेच्या मुजर कर्मचाऱ्यांवर आळा बसणार काय?.

वणी :- सुरज चाटे

     कामाची काही थकीत देयके काढून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या नगर परिषद आरोग्य निरीक्षक सह एकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकाऱ्यानी लाच घेताना यवतमाळ रोडवरील गजानन भोजनालय येथे दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 2.30 वाजता च्या दरम्यान रंगेहाथ पकडल्याची घटना उघडकीस आली.
      नगर परिषद वणी येथील लोकसेवक श्री जय अशोक उटवाल, आरोग्य निरीक्षक व लोकसेवक श्री. शुभम अनंता तायडे, कनिष्ठ अभियंता यांनी लाच मागणी केल्याची लेखी तक्रारी वरून दिनांक २६/०७/२०२३ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता यातील आरोपी लोकसेवक क. १) जय उटवाल आरोग्य निरीक्षक यांनी स्वतः करीता तक्रारदार यांना त्यांचे माहे जुन महिण्याचे देयकावर सही केल्याचा मोबदला व सदर कामात भविष्यात त्रास होऊ नये म्हणुन २०,०००/- रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केले. तसेच आरोपी लोकसेवक क. २) शुभम तायडे, पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता यांनी स्वतः करीता तक्रारदार यांना त्यांनी नगर परिषद वणी अंतर्गत वणी शहरातील घनकचरा संकलन, घनकचरा विलगीकरण, वाहतुक करणे, शौचालय सफाईचे कामपुर्ण केल्याचे एप्रील ते जुन महिण्याचे देयके तयार करून दिल्याचा मोबदला म्हणून २०,०००/- रूपये प्रमाणे मागील तिन महिण्याचे एकुण ६०,०००/- रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केले. 
     त्यावरून दिनांक ०१/०८/२०२३ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचुन आरोपी लोकसेवक क.१) जय उटवाल आरोग्य निरीक्षक यांनी गजानन भोयजनालय वणी येथे स्वत: करीता २०,०००/- रूपये लाचरक्कम तकारदार यांचे कडुन पंचासमक्ष स्विकारली असता आलो. से. क. १) जय अशोक उटवाल, आरोग्य निरीक्षक, आ.लो. से. क. २) शुभम अनंता तायडे, पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता यांना रंगेहात पकडण्यात आले. 
     सदरची कार्यवाही मा. श्री मारूती जगताप, पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र, अमरावती, श्री. देविदास घेवारे, अपर पोलीस अधीक्षक, अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक श्री. उत्तम नामवाडे, पोलीस निरीक्षक श्री. विनायक कारेगावकर पोलीस निरीक्षक श्री. अमित वानखडे आणि पोलीस अमलदार सचिन भोयर, महेश वाकोडे, अतुल मत्ते, अब्दुल वसिम राकेश सावसाकडे, राहुल गेडाम, सुधीर कांबळे, सुरज मेश्राम व चालक श्रेणी पोउपनि संजय कांबळे व सुधाकर कोकेवार सर्व नेमणुक अॅन्टी करप्शन ब्युरो, यवतमाळ यांनी केली.

Post a Comment

0 Comments