ADvt

मोटार सायकल चोराला पुण्यातुन अटक..



वणी :- सुरज चाटे

     फिर्यादी मनीष पुरुषोत्तम बोढे वयं ३२ वर्ष व्यवसाय व्यापार रा जैन ले आउट वणी ता.वणी जि.यवतमाळ यांनी दि.२५/०४/२०२३ रोजी पो.स्टे. वणी येथे तक्रार दिली की, ते वापरत असलेली त्यांची लाल काळया रंगाची पेशन प्रो. मोटार सायकल क्रमांक एम एच ३४ वाय ७२७९ कीमत अंदाजे १५,००० ची दि.२३/०४/२०.२३ रोजी सायं. ०५/३०वा दरम्यान ते गांधी चौक वणी येथील फेमस टेलरचे दुकाना समोर उभी ठेवून कामास गेले असता ती कोनीतरी अज्ञात चोराने चोरून नेली म्हणुन दिलेल्या रिपोर्ट वरून पो.स्टे. ला अप क ४.३०/२३ कलम ३७९ भादवि चा गुन्हा नोंद करून तपासावर आहे..

     सदर गुन्याचे तपासात चोरी गेलेली मोटार सायकल नामे हसन शेख शफी वय ३० वर्ष धंदा ऍटो मॅकेनिक रा कायर वार्ड क.०३ याचे कडे मिळुन आल्याने त्याला विचारपुस केले असता त्याने नमुद ची मोटार सायकल हि अर्जुन तांदुरकर रा. मोहली यांचे कडून ९,०००/ रुपयात विकत घेतली असल्याचे सांगीतले वरून नामे अर्जुन तांदुरकर रा. मोहर्ली यास विचारपुस केले असता त्याने सांगीतले की नमुद ची मोटार सायकल हि त्याचे गावातील नामे गजानन मधुकर जाधव, रा. मोहर्ली याचे कडुन ४,५०० रूपयात विकत घेतले असल्याचे सांगीतले गजानन मधुकर जाधव याचा गावात शोध घेतले असता तो मिळून आला नाही तो मागील ४ महिन्यापासुन मनमाड, येवला, नाशिक, पुणे येथे पोलीसांना हुलकावणी देत फिरत होता.

डीबी पथक प्रमुख सपोनि शिंदे सा यांना सदर गुन्हयातील मुख्य आरोपी गजानन मधुकर चव्हाण हो लोणी काळभोर ता हवेली जि.पुणे येथे असल्याची मिळालेल्या माहिती वरून त्यास लोणी काळभोर ता. हवेली, जि.पुणे येथे जावुन त्याचा शोध घेवून ताब्यात घेवुन गुन्हयासंबंधने विचारपुस केले असता त्याचा गुन्हयात सहभाग आढळुन आल्याने त्यास गुन्हयात अटक करून वि.कोर्ट वणी येथे हजर केले असता वि कोर्टाने दिनांक -२१/०८/२०२३ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर केले असून पोलीस रिमांड मध्ये आहे.

सदरची कार्यवाही मा.डॉ. पवन बन्सोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. गणेश कि उप.वि.पो. अ. वणी, पो. नि. अजित जाधव सा यांचे मार्गदर्शनात ही वो पथक प्रमुख सपोनि / माधव शिंदे, पो.स्टॉप सफी / सुदर्शन वानोळे पोना / पंकज उबरकर पोना हरीन्द्रकुमार भारती, पोका विशाल गेडाम, पोकों / गजानन कुडमेथे यानी केली असून पुढील तपास सफौ / १५९७ सुदर्शन वानोळे करीत आहे.

Post a Comment

0 Comments