ADvt

निळापुर येथील इसमाला ट्रकने उडविलेवणी :- सुरज चाटे

वणी तालुक्यातील निळापुर (बामणी) येथील अं 56 वर्षीय इसमाला दिनांक 16 ऑगस्ट ला सायंकाळी 9.30 वाजताच्या दरम्यान ट्रकने जोर दार धडक दिली त्यात 56 वर्षीय इसम जागीच ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

     वणी तालुक्यातील निळापुर येथील स्थित असलेला नामे विनोद वारलुजी काळे वय अंदाजे 56 वर्ष, हे दिनांक 16 ला सायंकाळी 9.30 वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या निळापुर येथे घरी जेवण करून घरा बाहेर पडले. दरम्यान विनोद आणि त्याचा एक सहमित्र सुहास आत्राम वय अंदाजे 40 वर्ष शौचालयास गेले रस्त्याने शौचालयास जात असताना वणीकडून निळापुर च्या दिशेने येणारा ट्रक क्रमांक एम एच 40 सी डी 6635 या ट्रकने समोरून येणाऱ्या विनोद व सुहास ला जोरदार धडक दिली दरम्यान धडक विनोद ला इतकी तीव्र बसली की त्यात विनोद हा बाजूने असलेल्या झुडपात पडला आणि विनोदचा जागीच मृत्यू झाला व त्याचा सहकारी सुहास आत्राम याला जबर मार लागल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

     विनोद च्या मागे पत्नी, पोरगी, जावई, मुलगा, भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे विनोद च्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


Post a Comment

0 Comments