ADvt

वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचे सुयशवणी :- राजु गव्हाणे

वणी येथील ग्रामगीताचार्य नारायणराव मांडवकर यांच्या जन्मदिवसाचे व भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य* साधून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय, वणी, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, शाखा-वणी, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, शाखा-वणी, खंडोबा-वाघोबा देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट, वणी, ओबीसी महिला समन्वय समिती, वणी आणि ओबीसी (व्हीजे/एनटी/एसबीसी) जातीनिहाय जनगणना कृती समिती, वणी- झरी-मारेगाव, जिल्हा-यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने वत्कृत्व स्पर्धा दि. १६ ऑगस्ट २०२३ रोज बुधवारला खंडोबा-वाघोबा देवस्थान सभागृह, वणी येथे आयोजित करण्यात आली होती. 
     ही स्पर्धा शालेय गट व खुला गट अशा दोन गटात घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये एकूण ७१ स्पर्धक सहभागी झाले होते. शालेय गटाकरिता "भारतीय स्वातंत्र्यानंतरची शेतकऱ्यांची स्थिती तर खुल्या गटाकरिता "भारतीय लोकशाही समोरील आव्हाने असे विषय ठेवण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामधून स्पर्धक सहभागी झाले व दमदार अशा वत्कृत्वाची मेजवानी वणीकर जनतेला उपलब्ध झाली. शालेय गटातून प्रथम क्रमांक तेजस्विनी गव्हाणे (वणी), द्वितीय क्रमांक अंशुल गोडे, (कोसारा), तृतीय क्रमांक क्रितेश पाल (नेरड) , प्रोत्साहनपर तन्वी धांडे (भेंडाळा ), अमृत चव्हाण( वणी) आणि खुशी सहारे (वणी ) तसेच खुल्या गटातून प्रथम क्रमांक प्रलय म्हशाखेत्री (चंद्रपूर) ,द्वितीय क्रमांक श्रृती मोहितकर (राजुरा) ,तृतीय क्रमांक निलेश भोस्कर (वणी) तर प्रोत्साहनपर आचल किन्हेकर (कोठोडा),जयशील कांबळे (महागाव ) यांनी पटकावल्या बद्दल त्यांना रोख रक्कम व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षिस वितरण सोहळ्याकरिता अध्यक्ष म्हणून अशोकराव चौधरी तर प्रमुख पाहुणे  म्हणून अनिल आक्केवार, वसंत गोरे, राम महाकुलकर, प्रभाकर मोहितकर, नारायण मांडवकर, धनराज भोंगळे, किशोर बोढे, निलिमा काळे, शंकर उरकुडे आणि रवि चांदणे हे उपस्थित होते.तर परीक्षक म्हणून प्रा.बाळकृष्ण राजूरकर, नामदेवराव जेनेकर,रविंद्र आंबटकर व गजानन चंदावार यांनी काम पाहिले.या कार्यक्रमाप्रसंगी *ओबीसी जातनिहाय जनगणनेकरिता झटणारे आणि तरुणांनाही लाजवेल अशी कामगिरी पार पाडणारे जेष्ठ कार्यकर्ते "श्यामराव घुमे आणि पांडुरंग पंडिले" यांना ओबीसी समाजभूषण सन्मान* देऊन सन्मानित करण्यात आले. 
     तसेच या वत्कृत्व स्पर्धेकरिता मेहनत घेणाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रघुनाथ कांडारकर, सूत्रसंचालन प्रदीप बोरकुटे व नितीन मोवाडे तर आभार प्रदर्शन विलास शेरकी यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक लोकांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments