ADvt

वणीची खुशी करणार आज विदर्भ क्रिकेट संघात विदर्भाचे प्रतिनिधित्व...



वणीची खुशी करणार आज विदर्भाचे प्रतिनिधित्व...

वणी :- सुरज चाटे


वणीच्या खुशी शंकर पिंपळकर हिची नुकतीच विदर्भ क्रिकेट संघात निवड झाली असुन आज दिनांक 19 ला विदर्भ विरुद्ध चंदिगढ असा सामना वडोदरा येथे रंगणार आहे, त्यात वणीची खुशी ही विदर्भ क्रिकेट संघाकडून विदर्भाचे प्रतिनिधित्व करीत खेळी दाखविणार आहे. एकीकडे आज विश्वचषकाची अंतिम लढत रंगणार असुन त्याकरिता संपूर्ण भारतवासीयांच्या नजरा या सामान्याकडे लागल्या असुन त्यातच अंडर 15 क्रिकेट मध्ये विदर्भाचे प्रतिनिधित्व करीत असलेली खुशी चंदिगढ विरुद्ध खेळणार आहे.
Vani's Khushi Shankar Pimpalkar has recently been selected in Vidarbha cricket team and today on 19th Vidarbha vs Chandigarh match will be played in Vadodara, Vani's Khushi will represent Vidarbha from Vidarbha cricket team.

वणीतील प्रसिद्ध इलेव्हन स्टार क्रिकेट क्लब नेहमीच क्रिकेट खेळाडूंकरिता व क्रिकेट प्रेमींकरिता नवनवीन स्पर्धा व उपक्रम राबवित असतात त्यातून अनेक खेळाडू उच्च स्थानापर्यंत पोहोचले आहे. अवघ्या चार वर्षांपासून क्रिकेट क्षेत्रात आपला प्रवास करीत असलेली खुशी ही 14 वर्षाची असुन, खुशीची निवड विदर्भ क्रिकेट संघात झाली आहे. मेहनतीने कोणत्याही स्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो हे खुशीने करून दाखविले असुन, कसून मेहनत केल्यास अपयशाला मागे सोडता येते व यश संपादन करता येत असल्याचे जिवंत उदाहरण आजच्या तरुण पिढी समोर ठेवले आहे. खुशीचे वडील शंकर पिंपळकर वेकोलीत कर्तव्यावर आहे. खुशीने वणीच्या शिरोपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. तसेच इलेव्हन स्टार क्रिकेट क्लब व विदर्भात वणीचे नावलौकिक केले आहे. खुशी आपल्या यशाचे श्रेय आई वडील, इलेव्हन क्रिकेट क्लब चे राजेंद्र मदान, मंगेश करंडे, नदीम शेख, विनोद निमकर, अनिरुद्ध पाथरडकर, सचिन पांडे, दिपा कुरील आदींना देत आहे

Post a Comment

0 Comments