ADvt

शेतीत पिकत तेव्हाच बाजारात विकत, शेतकऱ्यांनी एकत्र येणे ही काळाची गरज.... संजय देरकर


वणी :- सुरज चाटे

      शेतकरी जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो दिवसागणिक शेतीकडे नविन पिडी दुरावत असुन शेतकाऱ्यांशीवाय देशाचे काही खरे नाही. शेतकरी जगला तरच देश जगेल, त्यातच शेतकरी विरोधी काही सरकारची धोरणे या संपूर्ण बाबींचा विचार करून शेतकऱ्यांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे. 
     Farmers are known as the bread and butter of the world. Day by day, new crops are being removed from agriculture and there is nothing real about the country except farmers. The country will survive only if the farmers live, considering the anti-farmer policies of some governments, it is the need of the hour for the farmers to come together, Yavatmal District Central Bank Vice Chairman Sanjay Derkar has said in a program.

       शेतीत पिकत तेव्हाच बाजारात विकत..भारत हा कृषिप्रधान देश असुन, शेती हा महत्वाचा भाग आहे. अडेगाव येथे क्रांतिसूर्य बिरसामुंडा जयंती व बळीराजा महोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला होता दरम्यान यावेळी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राचे व पूजन करण्यात आले व त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय देरकर होते तर प्रमुख वक्ते जगदीश भगत यांनी अत्यंत सुंदर स्वरूपात बळीराजांविषयी प्रबोधन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून युवा सेना जिल्हा समन्वयक समीर लेनगुळे, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष केतन ठाकरे, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष आशिष झाडे, तर प्रमुख उपस्थिती म्हणून अविनाश चंदनखेडे, नागेश धनकासार, भगवान मोहीते, विनोद  ढुमने, डाॅ.जगन जुनगरी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून संजय देरकर यांनी सांगितले की, जेव्हा शेतात पिकत तेव्हाच बाजारात विकत, शेतकरी जगाचा पोशिंदा असून शेतकरी आज संकटात सापडला आहे, शेतकऱ्यांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. 

      कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रशांत बोबडे, शंकर झाडे, देव येवले, मंगेश झाडे, शुभम राऊत, राऊत परिवार व संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी अथक प्रयत्न केले. 

Post a Comment

0 Comments