ADvt

श्री रंगनाथ स्वामी मंदिरात वैकुंठ महोत्सवाचे आयोजन....श्री रंगनाथ स्वामी मंदिरात वैकुंठ महोत्सवाचे आयोजन....

विविध धार्मिक कार्यक्रम :- कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आयोजकांचे आवाहन...

वणी :- राजु गव्हाणे

      येथीलच प्रसिद्ध श्री रंगनाथ स्वामी मंदिरात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शनिवार दि. २५ नोव्हेंबर  २०२३ रोजी वैकुंठ चतुर्दशी निमित्त वैकुंठ महोत्सवाचे भव्य व भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
     यात सकाळी १० वाजता दांपत्या द्वारा रंगनाथ स्वामींच्या मूर्तीला महा अभिषेक होऊन महोत्सवाचा शुभारंभ, त्यानंतर दुपारी १ ते २ ब्रह्मांडनायक गजानन महाराज उपासना मंडळ वणी द्वारा सामुहिक उपासना, दुपारी २ ते ४ विजयबाबू चोरडीया द्वारा महाप्रसाद , दुपारी ४ ते ७ ह.भ.प. मनुमहाराज तुगनायत संच द्वारा विष्णुसहस्रनामावली पठन व  भक्ती गीतांचा कार्यक्रम, सायं ७ ते ८ यज्ञ सेवा समिती द्वारा सामुहिक श्री सुक्त हवन , रात्री ८ ते ९ धार्मिक देखावे (झांकीया) कार्यक्रमांची सांगता रात्री ९ ते १२ दीपोत्सव ,हरिहर मिलन , ब्रह्मोत्सव,, छप्पन भोग व महा आरतीने होईल. 

      हरिहर मिलन कार्यक्रम पौरोहित्य हिंगनघाट येथील पं.गोविंद महाराज जोशी करणार आहेत. सोबत वाद्यवृंदा सहित दक्षिण भारतातील वेदशास्त्रसंपन्न पंडित असणार आहेत. या कार्यक्रमाला भाविकांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित रहावे व घरुन छप्पन भोग करिता २५० ग्रॅम मिठाई आणावी तसेच मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments