ADvt

रोटरी क्लब चंद्रपुर व क्रशर असोसिएशन मोहदा तर्फे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन....विविध आरोग्य विषयक तपासणी :- मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आयोजकांचे आवाहन...

वणी :- सुरज चाटे

     वणी तालुक्यातील सर्वात मोठ्या प्रमाणात साधन संपत्तीने नटलेल्या गावामध्ये अग्रस्थानी असलेल्या मोहदा ग्रामपंचायत येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे आयोजन रोटरी क्लब ऑफ चंद्रपुर आणि क्रशर असोशिएशन मोहदा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले असुन या मध्ये लहान मुलांची तपासणी, हृदय तपासणी, सांधे व गुडघे दुखणे, स्त्री रोग चिकित्सा, मुख कर्करोग, ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशय तपासणी, डायबेटिस तपासणी, त्वचा रोग तपासणी सारख्या अनेक प्रकारच्या आरोग्य विषयक तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 
     दिनांक ४ नोव्हेंबर 2023 आज रोज शनिवारला सदर भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन. या कार्यक्रमाला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची प्रमुख उपस्थिती तर शिरपूर ठाणेदार संजय राठोड यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सौ. वर्षा राजुरकर, उपसरपंच सचिन रसेकर असणार आहे. या भव्य आरोग्य शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन आयोजक राजेश बियाणी, इस्माईल झवेरी, रमेश मुंधडा, अनुप यादव, कुंजबिहारी परमार यांनी नागरिकांना केले आहे. 

Post a Comment

0 Comments