घरी कुणी नसताना घेतला टोकाचा निर्णय :- आत्महत्येचे कारण अस्पष्ट?...
वणी तालुक्यातील आत्महत्येचे सत्र दिवसागणिक वाढतच चालले असुन दिनांक 12 डिसेंबर ला वणीतील शास्त्री नगर येथील अं 20 वर्षीय मृत युवक नामे अनिकेत विजय आवारी याने आपल्या राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
The suicide season in Vani taluka is increasing day by day and it has come to light that on December 12, a 20-year-old deceased youth named Aniket Vijay Awari from Shastri Nagar in Vani committed suicide by hanging himself at his residence.
वणीतील शास्त्री नगर येथील रहिवासी असलेला अनिकेत विजय आवारी, वय अं 20 वर्ष हा आपल्या आईसह शास्त्री नगर येथे राहत होता. अनिकेत ची आई कामाला गेली असता त्याने दिनांक 12 डिसेंबर ला रात्री 9 वाजताच्या दरम्यान आपल्या राहत्या घरी कुणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
अनिकेत ने इतके टोकाचे पाऊल का घेतले असावे? हे अजून अस्पष्ट आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असुन युवा अनिकेत च्या या चुकीच्या निर्णयाने मात्र कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान अनिकेत जगाच्या पडद्याआड गेला आहे. त्याच्या या टोकाच्या निर्णयाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सदरची माहीती वणी पोलीस स्टेशन ला मिळताच वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास वणी पोलिस करीत आहे.
0 Comments