ADvt

भारतीय अर्थव्यवस्थेत व्यापारी एक महत्वाचा घटक...ना. हंसराज अहीर...



भारतीय अर्थव्यवस्थेत व्यापारी एक महत्वाचा घटक...ना. हंसराज अहीर...

भाजपा व्यापारी आघाडीचा स्नेहमीलन उत्साहात


वणी :- राजु गव्हाणे
शेतकरी मंदीर वणी येथे भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी, वणी तर्फे दिवाळी निमित्त व्यापारी स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 08 ला शुक्रवार ला आयोजित करण्यात आला होता यात विविध मान्यवरांची उपस्थिती होती. Various dignitaries were present on the occasion of Diwali on the occasion of Diwali at Shetkari Mandir, Vani.


व्यापारी वर्ग आपल्या नित्याच्या कामात असतात, ग्राहकांचे समाधान हेच त्यांचे ब्रीद असते त्यामुळे आपल्या परिवाराला देखिल व्यापारी वर्ग विशेष वेळ देऊ शकत नाही. संपूर्ण व्यापारी वर्ग सर्व जनतेची दिवाळी उत्साहात व भरभराटीत व्हावी या दृष्टिकोनातून प्रत्येक व्यापारी आपापल्या दुकानातून ग्राहकांना गरजेनुसार साहित्यांची विक्री करतात. दिवाळी नंतर वणीतील काही व्यापारी मित्र परिवार भाजपा व्यापारी आघाडीच्या माध्यमातून स्नेहमीलन सोहळा साजरा करीत असतात.
 
याप्रसंगी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष व पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार हंसराजजी अहिर, आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, यवतमाळ भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्रजी बोर्डे, प्रदेश कार्य सदस्य विजयबाबू चोरडिया, प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा दिनकर पावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर, विस्तारक चंद्रपूर लोकसभा रवी बेलूरकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजयजी पिंपळशेंडे, व किशोरजी बावणे, भाजपा तालुकाध्यक्ष गजानन विधाते, बंडुभाऊ चांदेकर, व्यापारी आघाड़ी शहर अध्यक्ष लवलेश लाल, उपाध्यक्ष रवि रेभे, सुधीर साळी, सरचिटनीस संदीप मदान, तालुका अध्यक्ष आशीष ढवळे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
यावेळी हंसराजजी अहीर व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सर्व उपस्थित व्यापारी मित्रांना मार्गदर्शन केले हंसराज अहीर यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्थेत व्यापारी एक महत्वाचा घटक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच व्यापारी यांची महत्वाची भूमिका या बद्दल महत्वपूर्ण स्पष्टीकरण दिले. या कार्यक्रमात व्यापारी आघाड़ी चे पदाधिकारी व व्यापारी मोठया संख्येने उपस्थित होते. व्यापारी बंधुंशी संवाद साधत व्यापाऱ्यांचे शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आले आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. सर्व व्यापारी बांधवानी या कार्यक्रमाला उत्सफूर्त प्रतिसाद दिला तसेच कार्यक्रमासाठी व्यापारी आघाड़ी च्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments