ADvt

चालत्या कारने अचानक घेतला पेट....
वणी :- सुरज चाटे

     वरोरा वणी बायपास वरून वणीच्या दिशेने येत असलेल्या एका कार ला देरकर पेट्रोल पंप च्या समोर, वणी कृषी उत्पन्न बाजार समिती, जवळ धावत्या कारला अचानक आग लागली परंतु परिसरात असलेल्या जनतेनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कोणतीही वेळ हातून न घालवता तात्काळ अग्निशमन ला पाचारण करण्यात आले. अग्निशमन द्वारे आग विझविण्यात यश आले. सदर घटना दिनांक 20 ला 10.30 वाजताच्या दरम्यान घडली आहे. 
     A car coming towards Wani from Varora Vani Bypass caught fire suddenly in front of Derkar Petrol Pump, Vani Agricultural Produce Bazar Samiti, but the people in the area realized the seriousness of the incident and immediately called the fire brigade. The fire was extinguished by the fire brigade. The said incident took place on 20 December 2023 between 10.30 am.

     वणी - वरोरा मार्ग हा सारखा वर्दळीचा मार्ग म्हणून सर्वत्र परिचित आहे. सकाळच्या दरम्यान थंडीचा सपाटा असल्याने बऱ्या पैकी वाहतूक कमी झाली असली तरी घटना मात्र काही ना काही या मार्गावर घडतच असतात. दिनांक 20 ला सकाळच्या दरम्यान कार क्रमांक MH 31 DC 7459 वरोऱ्या च्या दिशेकडून वणी कडे जात होती. सकाळच्या सुमारास देरकर पेट्रोल पंप च्या समोर, वणी कृषी उत्पन्न बाजार समिती, जवळ अचानक कारला आग लागली.

      सदर आग लोकांच्या लक्षात येताच याची माहिती वणी पोलिसांना देण्यात आली, लगेच अग्निशमन विभागाला माहिती मिळताच चालक देविदास जाधव आपल्या चमुसह दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आग कशामुळे लागली अजुन कळू शकले नसले तरी, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे. 

Post a Comment

0 Comments