ADvt

मशाल मोर्चाने वेधले साऱ्यांचे लक्ष...सरकार उलथुन पाडा.... भास्कर जाधववणीत शिवसेनेचा लक्षवेधी मशाल मोर्चा :- विविध जनहिताच्या मागण्या घेऊन सेनेच वादळ धडकल वणी काचेरीवर...

वणी :- सुरज चाटे

     भाजपाने खोटी आश्‍वासने व भुलथापा मारत निवडणुका जिंकल्‍या. मात्र शेतकऱ्यांना दिलेले आश्‍वासन हवेत विरले आहे. जिवनात संकटे येतात आणि जातात. आत्‍महत्‍या सारखे टोकाचे पाउल उचलु नका, आगामी 2024 च्‍या निवडणुकीत धैर्याने सरकार उलथुन पाडा, असे आवाहन शिवसेना नेते आमदार भास्‍कर जाधव यांनी शेतकऱ्यांना केले. ते (उबाठा) शिवसेनेचे जिल्‍हा प्रमुख तथा माजी आमदार विश्‍वास नांदेकर यांनी दि 18 ला आयोजित केलेल्‍या मशाल मोर्चाला संबोधित करतांना बोलत होते.
    शहरातील टिळक चौकातुन (उबाठा) शिवसेनेचे जिल्‍हा प्रमुख तथा माजी आमदार विश्‍वास नांदेकर यांच्‍या नेतृत्‍वात मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील विवीध मार्गाने मार्गक्रमण करत मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख  राजेन्द्र गायकवाड, युवासेना जिल्हा‌प्रमुख विक्रांत चचडा, सुनिल कातकडे, वणी विधानसभा संपर्क प्रमुख विजयानंद पेंडणेकर, शरद ठाकरे, महेश चौधरी, जीवन डवरे उपस्‍थीत होते.
     मशाल मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे दिलीप भोयर, मिलींद पाटील, संभाजी ब्रिगेडचे अजय धोबे यांनी सहभाग घेतला होता. विधानसभा क्षेत्रातील वणी, मोरगाव व झरी तालुक्यातील पदाधिकारी,  महिला आघाडीच्या पदाधिकारी यांची मोर्चात लक्षणिय उपस्थिती होती. प्रास्ताविक गणपत लेडांगे यांनी तर संचालन तालुका प्रमुख प्रसाद ठाकरे यांनी केले. नेत्यांच्या  मार्गदर्शनानंतर विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.

 
                             
      सरकार बिनकामाचे ; विश्‍वास नांदेकर

वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी पुरता हतबल झाला आहे. प्रकल्‍पबाधीत शेतकऱ्यांचे आयुष्‍य प्रदुषणामुळे काळवंडले आहे. कोळशाची दळणवळण शेतकऱ्यांच्‍या मुळावर उठली आहे. प्रदुषणकारी कंपन्‍याबाबत सरकारने कुठेलेच धोरण निश्‍चीत केले नाही. पीकविमा योजना फसवी ठरत आहे. शेतमालाला योग्य भाव दिल्या जात नाही. निव्‍वळ भुलतापा मारून वेळ काढणारे हे सरकार बिनकामाचे आहे. असा आरोप करत (उबाठा) शिवसेनेचे जिल्‍हा प्रमुख तथा माजी आमदार विश्‍वास नांदेकर यांनी आयोजित मशाल मोर्चाच्‍या माध्‍यमातुन सरकारचा चांगलाच समाचार घेतला.

 
                            
               बैलबंडी व ट्रॅक्टरने वेधले लक्ष
(उबाठा) शिवसनेनेचे जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चामध्ये वणी विधानसभा क्षेत्रातील हजारो शिवसैनिकासह शेतकरी आपल्या बैलबंडीसह सहभागी झाले होते. प्रामुख्याने टॅक्टरधारक शेतकऱ्यांनी मोर्चात ट्रॅक्‍टरने मोर्चात एंट्री केली. झेंडा-पताकांनी सजविलेली बैलगाडी व ट्रॅक्टरनी वणीकरांचे लक्ष वेधल्‍याचे दिसुन आले. शहरातील रस्ते मोर्चाने हाऊसफुल्ल झाले होते. तर टिळक चौकातील सभेच्या माध्यमातून विविध मान्यवरांनी तसेच स्थानिक नेते तथा पदाधिकाऱ्यांनी सरकारवर घणाघात केल्याचे दिसून आले.

Post a Comment

0 Comments