वणी :- राजु गव्हाणे
भारतातील अयोध्या नगरीमध्ये श्री रामलल्ला च्या प्राणप्रतिष्ठेचा ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित केला आहे. तर दुसरीकडे वणीतील प्रभु श्रीराम मंदिर ला 25 वर्ष पूर्ण झाले असल्याने आनंददायी वातावरणात रजत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व वणी वासीयांना या आनंदी वातावरणात सहभागी व्हायचे आहे. सर्वांना कळविण्यात येते की, दिनांक सोमवार 22 जानेवारी 2024 ला, श्री राम दरबार, श्री राम मंदिर (खाती चौक, वणी) च्या प्राणप्रतिष्ठेला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या शुभ उत्सवानिमित्त परमपूज्य गुरुदेव महंत श्री 1008 खुशालदासजी महाराजजी (कलनौर) यांच्या उपस्थितीत रजत आहोत्सव व माँ दुर्गा शक्ती आणि शिव परिवाराचा प्राणप्रतिष्ठान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्राणप्रतिष्ठा श्री पंडित आचार्य अनिल जी रईच यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे सर्वांनी सहकुटुंब कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले असुन विविध कार्यक्रमांची मेजवानी सुद्धा राहणार आहे.
यात दिनांक 22 ला, आरती, कलश यात्रा (मिरवणुक), पुनर्नाहुती आणि मूर्तीची स्थापना, (शके १९४५ मिती पौष शुद्ध १२ (द्वादशी), महाप्रसाद, दीपप्रज्वलन, हनुमान चालिसाचे पठण व आरती, महाप्रसाद तरी सर्वांनी मोठ्या संख्येने होणाऱ्या कार्यक्रमास श्री राम मंदिर (खाती चौक), वणी येथे उपस्थित राहावे असे आवाहन पंजाब सेवा संघ, पंजाब युवा मंडळ, पंजाबी महिला मंडळ द्वारा आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments