ADvt

शेतकऱ्याचा शेतमाल चोरणारा निघाला सालगळीच



वणी :- सुरज चाटे

   दिनांक १५/०१/२०२४ रोजी पोलीस ठाणे वणी हद्दीतील विलास दत्तुजी देऊळकर, (50), रा. वांजरी ह.मु. वणी यांचे ग्राम कळमना खुर्द शिवारातील शेतात असलेल्या टिनाचे बंडयामध्ये ठेवून असलेल्या शेतमाल१५ क्विंटल सोयाबिन किमंत ६४,५०० रु चे चोरी गेले होते. आरोपीविरुध्द असाध क्रमांक ३९/२०२४ कलम ३७९ भा.द.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. दरम्यान त्या शेतकऱ्यांचा माल चोरणारा चक्क सालगळीच निघाल्याने आता शेतकऱ्याने विश्वास तरी कुणावर ठेवावा? हाच प्रश्न निर्माण झाला आहे. 
     On 15/01/2024, Vilas Dattuji Deulkar, (50), Res. Wanjari H.Mu. 15 quintals of soybean worth Rs 64,500 worth Rs 64,500 were stolen from Tina's farm in village Kalamana Khurd Shivara of Wani. Accused vs. Asadh No. 39/2024 Section 379 IPC A case was registered as follows. In the meantime, since the thief of the farmers' goods has turned out to be Salgali, who should the farmer trust now? This is the question that has arisen.

      शेतमाल चोरी झाल्याच्या घटना काही नव्या नाही, मात्र चोर आपलाच जवळीक निघतो तेव्हा अविश्वासाचा फैऱ्या उडतात. शेतकऱ्याच्या शेतमालाच्या चोरी संबंधाने गांभीर्य लक्षात घेवून, वणी येथे गुन्हा उघडकीस आणन्याचे दृष्टीने गुन्हयाचा तपास करुन गुन्हेगारांचा शोध घेत असतांना गुन्हयाचे फिर्यादी विलास दत्तुजी देठळकर यांचे शेतातील सालकरी अनिल चव्हाण रा. वांजरी यानेच शेतातील सोयाबीन चोरले असल्याची गोपणीय माहिती प्राप्त झाल्या वरुन लागूनच ग्राम वांजरी येथे जावून फिर्यादी यांचे शेतातील अनिल नामदेव चव्हाण वय ५० वर्ष, रा. बेघर वांजरी यास ताब्यात घेवून त्याचेकडे तपास केला असता त्याने चार ते पाच दिवसांपूर्वी त्याचे गावातील जयश देऊळकर, रोशन देऊळकर, व अतुल धवस यांचे मदतीने विलास दत्तुजी देऊळकर यांचे शेतातील बंडयामुधून अंदाजे २९ कट्टे सोयाबीन चोरले असल्याची व ते सोयाबीन त्याचे तिन साथीदारांनी मोटर सायकलवरुन नेऊन वणी येथे विकले असल्याची कबुली दिली. वरुन नमुद आरोपी १) अनिल नामदेव चव्हाण वय ५० वर्षे, रा. बेघर वांजरी व त्याचे साथीदार, २) रोशन तुळशीराम देउळकर वय ३० वर्षे, ३) जयेश शंकर देऊळकर वय २० वर्षे, ४) अतुल उर्फ विवेक अवधुत धवस वय २९ वर्षे, सर्व रा. वांजरी यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे सोयाबीन मालाबाबत विचारपूस केली. त्यांनी चोरी केलेले सोयाबिन वणी येथील १) विजय गुलाबराव निते, वय ४८ वर्षे व २) चंद्रशेखर पांडुरंग देठे, वय ३९ वर्षे, दोन्ही रा. चिखलगांव वणी या वेगवेगळ्या दुकानदारांना विक्री केले असल्याचे दिसुन आले. नमूद दुकानदार यांचेकडुन अनुक्रमे १९ व १० असे २९ कट्टे अंदाजे १५ क्विटल सोयाबीन किंमत ६४,५०० रु चे जप्त करुन आरोपीतांनी गुन्हयात वापरलेल्या ०२ मोटर सायकल किमंत सत्तर हजार असा एकुण १,३४,५०० रु चा मुद्देमाल जप्त करुन आरोपी १) अनिल नामदेव चव्हाण, वय ५० वर्षे, रा. बेघर वांजरी व त्याचे साथीदार, २) रोशन तुळशीराम देउळकर, वय ३० वर्षे, ३) जयेश शंकर देऊळकर, वय २० वर्ष, ४) अतुल उर्फ विवेक अवधुत धवस, वय २९ वर्षे, सर्व रा. वांजरी यांना अटक करून पो.स्टे. वणी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

    सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुष जगताप, श्री. आधारसिंग सोनोने पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा, यवतमाळ, पांचे मार्गदर्शनात सपोनि अतुल मोहनकर, सपोनि अमोल मुडे, पोलीस अंमलदार सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, योगेश डगवार, सुधीर पिदुरकर, निलेश निमकर, रजनीकांत मडावी, चापोहवा नरेश राउत सर्व स्था.गु.शा. यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Post a Comment

0 Comments