ADvt

सावित्री-जिजाऊ-रमाई-फातीमा यांच्या विचारांचे वाण समाजातील सन्माननीय सर्व विधवा सखींना हळदी-कुंकु कार्यक्रमात सहभागी करुन करुया...आनंद वाटुया-आनंद लुटुया
सन्मान स्त्री शक्ती फाऊंडेशन संस्थापीका कीरण देरकर यांचे समाजातील सर्व महीलासखींना आवाहन.

वणी :- सुरज चाटे

    आज संक्रांत.... सर्व सख्यांना या संक्रांतीत अखंड सौभाग्य, सुदृढ आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच मायभवानी चरणी प्रार्थना. आज समाजातील आपन सर्व सखी नटूनथटून आनंदाने हळदी-कुंकु  करतो करायलाही पाहीजे.
    हा सणच आनंद वाटण्याचा व लुटण्याचा सण आहे परंतु याच वेळेस समाजातील आपल्या शेजारच्या घरात तरुण विधवा सखी रडत- दु:ख भोगत असते. अशावेळी तीचे मनोबल वाढवीने तीचा आधारस्तंभ बनुन तिला आपल्यामधे सहभागी करुन घेणे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. तु समाजात वेगळी नसुन समाजातील एक सन्माननीय घटक आहे ह्याची जाणीव तीला करुन देने हेच माता सावित्री-जिजाऊ-रमाई-फातीमा यांना अभिप्रेत होते त्यांचा विचांरांच्या हळदी-कुंकवाची आज समाजाला गरज आहे*.म्हणून सर्व प्रीय सखींनी आपल्या घरच्या हळदी-कुंकु कार्यक्रमात समाजातील आमच्या सर्व सन्माननीय विधवा सखींना सहभागी करावे व त्यांना आनंदी जीवन जगण्याचा अधिकारी करावे ही आग्रहाची विनंती.
     चला तर मग सख्यांनो ही संक्रांत आपण माता सावित्री- जिजाऊ -रमाई-फातीमा यांच्या विचारांचे वाण समाजातील सन्माननीय सर्व विधवा सखींना हळदी-कुंकु कार्यक्रमात सहभागी करुन करुया...आनंद वाटुया-आनंद लुटुया सन्मान स्त्री शक्ती फाऊंडेशन संस्थापीका कीरण देरकर यांचे समाजातील सर्व महीलासखींना आवाहन.

Post a Comment

0 Comments