ADvt

दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी वाण आरोग्याचे व स्त्रीयांच्या सन्मानाचे...



कोण जिंकणार महापैठणी :-  प्रबोधनपर हळदी-कुंकु, सहभाग घेण्याचे सौ किरण संजय देरकर यांचे आवाहन..

वणी :- सुरज चाटे

     दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सन्मान स्त्री शक्ती फाऊंडेशन च्या संस्थापिका सौ किरण देरकर यांच्या संकल्पनेतुन वाण आरोग्याचे व स्त्रियांच्या सन्मानाचे प्रबोधनपर हळदी कुंकवाच्या 100 कार्यक्रमाचे आयोजन विविध ठिकाणी करण्याचा मानस आहे. त्यातील पहिला कार्यक्रम जैन ले आऊट येथे दिनांक 15 जानेवारी 2024 ला आयोजित केला आहे.

    आज संक्रांत असुन सर्व सख्यांन्या या संक्रांतीत अखंड सौभाग्य, सुदृढ आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना असुन, आज समाजातील सर्व सखी नटूनथटून आनंदाने हळदी-कुंकु  करतात व करायलाही पाहीजे. हा सण आनंद वाटण्याचा व लुटण्याचा सण आहे. परंतु याच वेळेस समाजातील शेजारच्या घरात तरुण विधवा सखी रडत- दु:ख भोगत असते. अशावेळी तीचे मनोबल वाढवीने तीचा आधारस्तंभ बनुन तिला सहभागी करुन घेणे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. 

    ती समाजात वेगळी नसुन समाजातील एक सन्माननीय घटक आहे ह्याची जाणीव तीला करुन देने हेच माता सावित्री-जिजाऊ-रमाई-फातीमा यांना अभिप्रेत होते. त्यांचा विचांरांच्या हळदी-कुंकवाची आज समाजाला गरज आहे म्हणून सर्व प्रीय सखींनी आपल्या घरच्या हळदी-कुंकु कार्यक्रमात समाजातील सर्व सन्माननीय विधवा सखींना सहभागी करावे व त्यांना आनंदी जीवन जगण्याचे अधिकारी करावे अशा आगळ्या वेगळ्या संकल्पनेतून सौ किरण संजय देरकर संस्थापक सन्मान स्त्री शक्ती फाऊंडेशन च्या माध्यमातून विधवा महिलेंकरिता सशक्तीकरणाची जनजागृतीचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, सोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम व आकर्षक भेटवस्तू व पैठणी सुद्धा जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे, तरी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमात महिलांनी आपला सहभाग नोंदवला असे आवाहन प्रिय सखींना केले आहे.

Post a Comment

0 Comments