ADvt

राजमाता जिजाऊंचे विचार जपणे काळाची गरज...संजय देरकर



टायगर ग्रुप च्या वतीने अपंग निवासी शाळेत जिजाऊ जयंती...

वणी :- सुरज चाटे

     टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य वणी च्या वतीने अपंग निवासी शाळा वणी येथे राजमाता जिजाऊ जयंती निमित्य समाजिक उपक्रम राबवण्यात आला. यावेळी खाऊचे वाटप करीत प्रेत्येक विद्यार्थ्याला बुक, पेन देण्यात आले व राजमाता जिजाऊची प्रतिमा शाळेला भेट देण्यात आले.
     On behalf of Tiger Group Maharashtra State Vani, a social activity was conducted at the Handicapped Residential School Vani on the occasion of Rajmata Jijau Jayanti. On this occasion, food was distributed, books, pens were given to every student and an image of Rajmata Jijau was presented to the school.


     टायगर ग्रुप संस्थापक जालिंदर जाधव, टायगर ग्रुप राष्टीय अध्यक्ष  तानाजी जाधव, नागपूर जिल्हा अध्यक्ष  प्रशांत नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली  जिजाऊ जयंती निमित्त अपंग निवासी शाळेत राजमाता जिजाऊ जयंतीचा कार्यक्रम आयोजित  करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर हे होते. तसेच प्रमुख उपस्थिती सम्मान स्त्री शक्ती फाऊंडेशन च्या संस्थापिका सौ किरण ताई देरकर या होत्या. दरम्यान संजय देरकर यांनी उपस्थितांना मौलिक मार्गदर्शन केले,  तसेच मा जिजाऊंचे विचार जपणे  काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. किरण ताई यांनी आजची जिजाऊची लेक कशी असली पाहिजे याबद्दल विचार मांडले. सामज सेविका शाळेतील कर्मचारि तसेंच  टायगर ग्रुप  वणी मारेगाव झरी जामणी समाजिक कार्यकर्ते  नरेश ठाकरे  तालुका प्रमुख वणी, देवा भाऊ साखरकर अंतरराष्ट्रीय  हिंदू सेना जिल्हा अध्यक्ष   टायगर ग्रुप सद्स्य, मोट्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments