ADvt

एकता सरकारने वर्धा जिल्ह्याच्या इतिहासात राष्ट्रीय स्तरावर रोवला मानाचा तुरा....ऍड. रझा हुसैन हैदरी..



राष्ट्रीय शुटींग बॉल चॅम्पियनशिप मध्ये एकताची निवड...

सत्यभाषा डेस्क :- "क्रीडा प्रशिक्षण ही आज काळाची गरज आहे. यातून मुला-मुलींमध्ये लहानपणापासूनच धैर्य, स्वावलंबन आणि आत्मविश्वास निर्माण होतो. शारीरिक शिक्षणाने बुद्धिमत्ता विकसित होते. तर क्रीडा प्रशिक्षणाने आत्मविश्वास वाढतो.
       बुद्धिमत्तेबरोबरच- सोबतच शारीरिक विकासही महत्त्वाचा आहे. शिक्षणासोबतच खेळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचा विकासही सहज करता येतो. एकता कृष्णा सरकार हिने आपल्या अथक परिश्रमाने शुटींग बॉल या खेळात राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून संपूर्ण वर्धा जिल्ह्याचे नांव देशात चमकवले आहे. वर्धा जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. वणीचे ज्येष्ठ वकील एड. रझा हुसेन हैदरी यांनी एकता सरकारची भेट घेत तिचे कौतुक केले.
        Along with intelligence, physical development is also important. Along with education, personality development can also be done easily through sports. Ekta Krishna Sarkar has made the name of the entire Wardha district shine in the country by excelling in shooting ball at the national level with her tireless hard work. This is a matter of pride for Wardha district. Wani's senior lawyer Ed. Raza Hussain Hydari met the unity government and praised it.
     एकता सरकारच्या वतीने स्थानिक पातळीवर आयोजित सत्कार कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी एड. प्रेम ताकसांडे, एड. इब्राहिम बख्श, एड. विजयेंद्र ढेकले, डॉ. शाहीन हैदरी आणि एड. अस्मिता मुंगल यांची प्रमुख उपस्थिती होती. उत्तर प्रदेश शूटिंग बॉल असोसिएशन आणि शुटिंग बॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने गाझियाबाद येथे राष्ट्रीय शुटींग बॉल चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संपूर्ण विदर्भतून हिंगणघाटच्या एकता सरकारची निवड करण्यात आली. एकताने आपले कौशल्य दाखवून सर्वांना आश्चर्यचकित केले. याआधीही एकता सरकारने दोन वेळा जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवून दिला आहे.
      एकताने आपल्या यशाचे श्रेय गुरु विनोद भुते यांच्यासह आई-वडील आणि भावाला दिले आहे. एकता सरकारला त्याच्या यशासाठी एड, सारिका चव्हाण दाभाडे, एड. सिमरन थडानी, एड. क्षमा सुटे, एड. राहत पटेल, एड. अश्विनी तपासे, एड. करिष्मा कांबळे, एड. वासेकर, एड. पूजा सहारे, एड. विनय जोशी, डॉ.कृष्णा सरकार, माधवी सरकार, कुशल सरकार, चेतन ठाकरे, सना मोहम्मद कय्युम आदींनी तिचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments