ADvt

कुमारिकेचा बंद गिट्टी खाणीच्या पाण्यात बुडून मृत्यू


संग्रहित छायाचित्र


वणी :-  सुरज चाटे

    तालुक्यातील मोहदा येथील एक 15 वर्षीय कुमारिका एका बंद गिट्टी खाणीच्या पाण्यात कपडे धुण्या करिता गेली असता अचानक तिचा पाय घसरला आन त्याच पाण्यात बुडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना दिनांक 04 एप्रिल 2024 रोजी दुपारच्या दरम्यान उघडकीस आली. विद्या अनिल आडे असे मृतक मुलीचे नाव आहे. 
     A sensational incident came to light on 04 April 2024 during the afternoon when a 15-year-old girl from Mohda in the taluka went to wash her clothes in the water of a closed ballast mine when her foot suddenly slipped and she drowned in the same water. The deceased girl's name is Vidya Anil Ade.
     वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन च्या हद्दीत येणारे मोहदा या गावात मोठ्या प्रमाणात गिट्टी क्रेशर आहेत. यातील काही क्रेशर बंद स्थितीत आहे. या गिट्टी खाणीच्या कडेलाच मोठा पाणी साठा असुन जणू त्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. अशाच एक बंद असलेल्या गिट्टी खदानीतील पाण्यात विद्या अनिल आडे (15) वर्षीय कुमारिका ही कपडे धुण्याकरिता मोहदा गावालगत असलेल्या बंद खदानीत दिनांक 04 ला दुपारच्या सुमारास गेली असता कपडे धुत असतांना अचानक पाण्यामध्ये तीचा पाय घसरला 
आणी खोल पाण्यात बुडु लागली सोबत असलेली मुलगी घाबरली तिला काय करायचे सुचेना से झाले, लगेच आरडाओरडा करत आजु बाजुचे लोकांनी खदानीकडे धाव घेतली. 
      कुटुंबियांना घटनेची माहिती कळताच मुलीचे वडील आले, काहींनी पाण्यात उड्या मारल्या परंतु तो पर्यंत विद्या चा पाण्यात बुडुन मृत्यू झाला होता. घटनेची माहिती पो स्टे शिरपुर ला देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. विद्याचा मॄतदेह बाहेर काढून पोलीसांनी घटणास्थाळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय वणी येथे दाखल केला. सदर मॄतदेहाचे शवविच्छेदन करून मॄतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली असुन हे बंद कोळसा खाणी जनतेसाठी धोकादायक ठरत असल्याचे दिसत असुन याचा बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

तोच नवविचा पेपर ठरला अखेरची परीक्षा...
      मोहदा येथे राहत असलेली विद्या ही नवव्या वर्गात शिकत होती. दि 04 ला ती पेपर देऊन घरी आली होती आणि कपडे धुण्यासाठी बंद गिट्टी खाणीकडे गेली असता तेच क्षण तिच्या जीवनाचा अंतिम क्षण ठरला असुन तोच पेपर जीवनातील अंतिम पेपर ठरल्याचे बोलल्या जात आहे. 

मोहदयातील बंद गिट्टी खाणीवर नियंत्रण कुणाचे?....
     तालुक्यातील मोहदा येथे मोठ्या प्रमाणात गिट्टी क्रेशर आहेत. दरम्याम याच ठिकाणी काही बंद गिट्टी खाणी सुद्धा आहे. त्यामुळे या बंद झालेल्या गिट्टी खाणी शासनाला हँडओव्हर केल्या असल्याची चर्चा असुन मग यावर नियंत्रण कुणाचे? असा सवाल उपस्थित होत असुन त्या बंद खणीच यम खाणी ठरत असल्याचे दिसुन येत आहे. 

Post a Comment

0 Comments