ADvt

वणी लॉयन्स हायस्कुलचे सुयशशालान्त प्रमाणपत्र परीक्षेत वणी लायन्स हायस्कूलचे सुयश....

उज्वल यशाची परंपरा कायम...

वणी :- सुरज चाटे

येथील वणी लायन्स चॅरीटेबल ट्रस्ट द्वारा संचालीत वणी लायन्स इं. मिडी. हायस्कुल चा मार्च (२०२४) इयत्ता दहावीच्या निकाल ९९.४३ टक्के लागला असून, विद्यार्थ्यांनी याही वर्षी शालेय प्रमाणपत्र परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

Vani Lions Inc. managed by Vani Lions Charitable Trust here. Midi. The March (2024) class 10 result of the high school is 99.43 percent and the students have achieved great success in the school certificate examination this year as well.

सदर परीक्षेत सौरभ चंद्रकांत ठाकरे या विद्यार्थ्याने (९४.६०%) टक्के गुण संपादन करून शाळेतून प्रथम क्रमांक व वणी तालुक्यातुन दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तसेच मानसी लीपटे (९३.४०%), यथार्थ छल्लानी (९३.००%), हर्षा वाभीटकर (९२.८०%), आकांक्षा दयालाल निकुंबे (९२.८०%), एकलव्य जयप्रकाश बल्की (९२.००%), यशस्वी रणजीत कोडापे (९१.८०%), मंधन अजय हेपट (९१.००%), शिव संतोष टेबुर्डे (९०.८०%), भाग्यश्री दिलीप डाखरे (९०.६०%), अनुष्का अभय भुजाडे (९०.६०%), अर्णव चेताराम खाडे (९०.००%), यांनी गुणानुक्रमे क्रमांक पटकावले. शाळेतून ६९ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह, ७५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तर २९ विद्यार्थीनी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण होवून यश प्राप्त केले.

 संस्थेचे अध्यक्ष व वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार लायन संजीवरेडडी बोदकुरवार, उपाध्यक्ष लायन बलदेव खुंगर, सचिव लायन सुधीर दामले, कोषाध्यक्ष लायन चंद्रकांत जोबनपुत्रा, सदस्य सर्वश्री लायन शमीम अहेमद, लायन नरेंद्रकुमार बरडीया, लायन किशन चौधरी, लायन महेंद्रकुमार श्रीवास्तव, लायन राजाभाऊ पाथ्रडकर, लायन क्लब वणी व वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे सन्माननीय पदाधिकारी व सदस्यानी, तसेच शाळेचे प्राचार्य प्रशांत गोडे, वणी लायन्स वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य दिपासिहं परिहार, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments