ADvt

लायन्स इं.मिडि. स्कूल व ज्युनि. काॅलेज येथे विद्यार्थी प्रवेश उत्सव साजरा....लायन्स इं.मिडि. स्कूल व ज्युनि. काॅलेज येथे विद्यार्थी प्रवेश उत्सव साजरा....

पुष्पगुच्छ देऊन पालकांचे व चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत...

वणी :- सुरज चाटे 

        येथील वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शाळेचा पहिला दिवस प्रवेश उत्सव म्हणून, पालक व विद्यार्थ्यांच्या प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळा व लायन्स ट्रस्ट चे अध्यक्ष तथा वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, उपाध्यक्ष बलदेव खुंगर, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थी व पालकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले .
    The first day of school at Lions English Medium School and Junior College, run by Vani Lions Charitable Trust here, was celebrated with great enthusiasm by parents and students as an entrance festival.
 
     उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टी नंतर १ जुलै, सोमवारी शाळा सुरू झाल्या. संपूर्ण शालेय परिसर व वर्ग खोल्यांची स्वच्छता करुन प्रवेशद्वार, फुले व फुग्यांच्या आकर्षक कमानी उभारून, स्वागत द्वार, सेल्फी पाँइंट तसेच वर्ग खोल्यांची सजावट करण्यात आली होती. वणी  लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा नर्सरी ते बारावी तसेच विज्ञान शाखेतील बी.एस.सी.पदवी पर्यंत चे शिक्षण लायन्स प्रायमरी स्कूल (देशमुखवाडी) ,हायर प्रायमरी स्कूल (रवि नगर) तसेच हायस्कूल, कनिष्ठ विज्ञान व वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय (नांदेपेरा मार्ग) येथील प्रशस्त ईमारती मधून दिल्या जाते.
     दीर्घ सुट्टी नंतर पहिल्या दिवशी शाळेत जाण्याचा उत्साह व आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता . यावेळी आमदार श्री संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्रा साठी शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्री बलदेव खुंगर, शाळा समितीचे पदाधिकारी व सदस्य,मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह शेवटपर्यंत कायम राहो ही सदिच्छा व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments