सोमनाळा फाट्याजवळ भीषण अपघात...
ट्रकच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू; एक गंभीर जखमी
वणी :— सुरज चाटे
वणी–मारेगाव मार्गावरील सोमनाळा फाट्याजवळ दि. ११ रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजताच्या सुमारास ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात झाला.
अपघात इतका गंभीर होता की दुचाकी स्वारांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. प्रविण तुळशीराम येरमे (४२) रा. पांढरकवडा (पिसगाव) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नांव आहे. तर दुसरा युवक गंभीर जखमी असून त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
A horrific accident occurred between a truck and a motorcycle near the Somnala junction on the Wani-Maregaon road on the evening of November 11th, at approximately 6 PM. The accident was so severe that one of the motorcycle riders died on the spot. The deceased has been identified as Pravin Tulshiram Yerme (42), a resident of Pisgaon, Pandharkawada. The other young man sustained serious injuries and was immediately taken to the hospital for treatment.
घटनेनंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ट्रक चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.








0 Comments